Jump to content

चिवडा

चिवडा हा विशेषकरून दीपावलीमध्ये केला जाणारा एक मराठी खाद्यपदार्थ आहे.[] हा पदार्थ बऱ्याचदा खाऱ्या, तिखटसर तसेच गोड चवीचा बनवतात. चिवडा या पदार्थाशिवाय दीपावली हा सण अपूर्ण असल्यासारखा वाटतो.

पातळ पोह्यांचा चिवडा
भाजलेल्या पोह्यांचा चिवडा

महाराष्ट्रातल्या केवळ गंमत म्हणून खायच्या खाद्य पदार्थात चिवड्याचा अनेकदा वापर होतो. चहा-चिवडा हे उत्तम जोडखाणे आहे.

महाराष्ट्रातील चिवडे

  • आष्टा मोडचा (ता. चाकूर) चिवडा.
  • इंदूरचा मीठा चिवडा
  • उत्तर प्रदेशातील मक्याचा चिवडा
  • कोंडाजी चिवडा (नाशिक)
  • खमंग बेष्ट चिवडा (पुणे)
  • गुरुप्रसाद चवडा (अहमदनगर)
  • चिवडा गल्लीतला चिवडा (लालबाग-मुंबई)
  • चुरमुऱ्याचा चिवडा
  • ज्योतीचा चिवडा (करणारी ज्योती गोकाणी)
  • ढेंका में कुटा हुआ चिवड़ा (कलकत्ता)
  • नमकीन चिवडा (बिहार)
  • नामदेव चिवडा (सोलापूर)
  • पातळ पोह्यांचा चिवडा
  • उपासाचा बटाटा चिवडा
  • बारुदी चिवडा (नागपूर)
  • बुढीचा चिवडा (यवतमाळ)
  • बेक्ड नाचणी चिवडा
  • भडंग चिवडा, गोड पोहा चिवडा (धुळे)
  • भवानी चिवडा (सांगली)
  • भाजक्या पोह्यांचा चिवडा
  • मकाजी चिवडा (नाशिक)
  • महालक्ष्मी चिवडा (मुंबई, कोल्हापूर)
  • महाशय जी प्रसिद्ध चिवडा (इंदूर)
  • माधवजी का बढिया चिवडा (नाशिक)
  • माधुरीचा नमकीन महाराष्ट्रियन चिवडा
  • मोहोळचा लांबोटी चिवडा
  • लक्ष्मीनारायण चिवडा (भवानी पेठ, पुणे)
  • शहाजी का प्रसिद्ध चिवडा (इंदूर)
  • सुरकी धान चिवड़ा (भागलपूर)

बाह्य दुवे

  1. ^ author/lokmat-news-network (2021-10-26). "पोह्यांचा कुरकुरीत चिवडा करण्याची खमंग रेसिपी! 'असा' झकास चिवडा, दिवाळीची शान". Lokmat. 2021-11-20 रोजी पाहिले.