Jump to content

चिरक

चिरक
शास्त्रीय नाव सॅक्सीकोलॉईडस फुलीकॅटस
(Saxicoloides fulicatus)
कुळ जल्पकाद्य
(Muscicapidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश इंडियन रॉबिन
(Indian Robin)
संस्कृत पोदकी, कृष्णपक्षी
इंडियन रॉबीन विलपट्टू

चिरक (शास्त्रीय नाव: Saxicoloides fulicatus, सॅक्सीकोलॉईडस फुलीकॅटस ; इंग्लिश: Indian Robin, इंडियन रॉबिन) हा जल्पकाद्य पक्षिकुळातील एक पक्षी आहे. याची लांबी साधारणपणे १७ सेंमी असते. याची मराठी भाषेतील इतर नावे चीरक, काळोखी, खोबड्या चोर, कोळशी, लहान सुई हे आहेत.

माहिती

महाराष्ट्रातील, इंडियन रॉबीन नर

कस्तुर आणि गप्पीदास पक्ष्यांच्या कुटुंबातील हा एक पक्षी झुडपी रानात, तसंच शहरात आणि खेडेगावांमध्येही दिसतो. दगडगोटे आणि तरवडी-काटेचेंडूसारखी खुरटी झुडपं पसरलेल्या लहान लहान टेकड्या हा चीरकाचा आवडता परिसर. या पक्ष्याचा मुख्य आहार म्हणजे किडे, कोळी इ. या पक्ष्यांची शेपटी उभारलेली असते आणि पंख शेपटीच्या बाजूंवर पाडलेले असतात. नर काळा कुळकुळीत तर मादी तपकिरी रंगाची असते. नर उडाला की त्याच्या पंखावर पांढरा डाग दिसतो. मादीच्या पंखांवर असा डाग नसतो.

या पक्ष्यांचं घरटं म्हणजे एखाद्या दगडाच्या आडोशाला गवत, चिंध्या, झाडांची मुळं, केस, दोऱ्या यांचा उपयोग करून तयार केलेली वाटी. घरट्यासाठी पक्षी कधी कधी अत्यंत धाडसी जागा निवडतो. पण घरटं सहसा सहज दिसणारा नाही असं असतं. एप्रिल ते जून या दरम्यान विणीचा हंगाम असतो.

डोमिंगा किंवा दयाळ (Magpie Robin) हा काळा पांढरा, ओळखायला अगदी सोपा असा पक्षी आहे. चीराकाप्रमाणे हा पक्षी मनुष्यवस्तीच्या आसपास दिसतो. उद्यानं घराभोवातीच्या बागा, आमराया आणि पानझडीच्या जंगलातही दयाळ दिसतो. घरटं करण्याचा काळात म्हणजे एप्रिल पासून जुलैपर्यंत दयाळाचं गोड गाणं ऐकू येतं. हे गाणं गाण्यासाठी गवईबुवा उंच झाडाच्या शेंडयावर बैठक जमवतात. कारण उंच जागेवरून दूरवर आवाज पोहोचू शकतो. चीरकाच्या गोलाकार वाटीसारख्या घरट्यात सापाची कात लावलेली असते. सापाची कात म्हणजे साप असल्याची खुण त्यामुळे कदाचित् त्याच्या घरट्याभोवती संरक्षण कवच तयार होत असेल. घरट्याचं संरक्षण होत असेल. पण यामागचं नेमकं कारण शोधलं पाहिजे.

संदर्भ

दोस्ती करू या पक्ष्यांशी:श्री. किरण पुरंदरे.