चिमूर तालुका
?चिमूर महाराष्ट्र • भारत | |
टोपणनाव: क्रांती जिल्हा (प्रस्तावित नाव) | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | नागपूर |
भाषा | मराठी |
नगराध्यक्ष | |
तहसील | चिमूर |
पंचायत समिती | चिमूर |
कोड • पिन कोड • दूरध्वनी | • 442903 • +०७१७० |
चिमूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. पूर्वीच्या चिमूर या गावी झालेल्या स्वातंत्र्य लढ्यासाठी चिमूर शहराला विशेष दर्जा देऊन चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करावा, यासाठी इ.स. १९८० सालापासून अनेक आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र सरकारने मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.
चिमूरचा स्वातंत्र्य लढा
महात्मा गांधींनी १९४२ मध्ये 'चले जाव'चा नारा दिल्यानंतर चिमुरात आंदोलन झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आवाहनानंतर ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवून चिमूर ३ दिवसांसाठी का होईना स्वतंत्र झाले होते.
- भारतातील हे पहिले स्वातंत्र्य होते. १४ ते १६ ऑगस्टपर्यंतचे हे स्वातंत्र्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून जगाला कळविले होते.
स्वातंत्र्यसमर
'चले जाव' आंदोलनाचे विदर्भातील प्रेरणास्थान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. चिमूर येथील स्वातंत्र्य संग्राम त्यांच्याच प्रेरणेने घडला. स्वातत्र्याच्या मागणीसाठी नागरिकांनी विशाल मोर्चा काढला. या मोर्चाला अटकाव करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. त्यामुळे चिडलेल्या नागरिकांनी विश्रामगृहाला आग लावली. पुन्हा एकदा पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे अनेक नागरिक शहीद झाले. चिमूरच्या २०० सेनानींवर विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयांत खटला चालला. २१ क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तर २६ जणांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली.
ऐतिहासिक घटना
चिमूरची ती ऑगस्ट क्रांती आजही स्वातंत्र्य लढ्याचा दैदीप्यमान इतिहास सांगते.