चिमणाबाई द्वितीय
महाराणी चिमणाबाई (जन्म १८७२ - मृत्यू २३ ऑगस्ट १९५८), यांना चिमणाबाई (द्वितीय) म्हणूनही ओळखले जाते. त्या बडोदा, गुजरात, ब्रिटिश भारतातील संस्थानाचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या द्वितीय पत्नी होत्या.
चरित्र
१८८५ मध्ये सयाजीराव गायकवाड यांच्याशी विवाह केल्यावर श्रीमंत लक्ष्मीबाई मोहिते या चिमणाबाई [१] झाल्या.
मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या चिमणाबाई यांनी, पर्दा पद्धत आणि बालविवाह पद्धत रद्द करण्यासाठीही काम केले. एक प्रगतिशील महिला म्हणून त्या ओळखल्या जातात.[२]
आणि १९२७ मध्ये ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सच्या पहिल्या अध्यक्षा बनल्या [३] [४] द पोझिशन ऑफ वुमन इन इंडियन लाईफ (१९११) या ग्रंथाच्या त्या लेखिका आहेत. [५]
अन्य माहिती
- त्यांची मुलगी इंदिरा देवी कूचबिहारचे महाराज जितेंद्र नारायण यांची पत्नी झाली. [६][७]
- १९३० साली चिमणाबाई यांना योगी श्रीअरविंद यांनी योगसाधनेसंबंधी मार्गदर्शन केले होते. ते पत्र उपलब्ध आहे. [८]
- चित्रकार राजा रविवर्मा यांनी १८८९ मध्ये त्यांचे पोर्ट्रेट पेंटिंग केले होते.[९]
ग्रंथ
- चिमणाबाई द्वितीय आणि सिद्ध मोहना मित्रा, द पोझिशन ऑफ वुमन इन इंडियन लाईफ (१९११), न्यू यॉर्क, लाँगमन, ग्रीन आणि कंपनी
अधिक वाचन
- मूर, लुसी (२००४) महाराणीज: द लाइव्हस अँड टाइम्स ऑफ थ्री जनरेशन्स ऑफ इंडियन प्रिन्सेसेस (महाराणी: भारतीय राजकन्यांच्या तीन पिढ्यांचे जीवन आणि काळ). लंडन: वायकिंग आयएसबीएन 0-670-91287-5
- कलेक्टेड वर्क्स ऑफ श्रीअरबिंदो, खंड ३६
संदर्भ
- ^ Taylor, Miles (2018). "9. Mother of India". Empress: Queen Victoria and India (इंग्रजी भाषेत). New Haven: Yale University Press. p. 202. ISBN 978-0-300-11809-4.
- ^ "Personalia / Chimnabai II, Maharani of Baroda". sri-aurobindo.co.in. 2023-03-29 रोजी पाहिले.
- ^ "Past Presidents". AIWC: All India Women's Conference. 19 March 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-03-19 रोजी पाहिले.
- ^ Geraldine Forbes; Geraldine Hancock Forbes (28 April 1999). Women in Modern India. Cambridge University Press. pp. 79–. ISBN 978-0-521-65377-0.
- ^ Jhala, Angma Dey (2014). "8. Memoirs of Maharanis: the politics of marriage, companionship, and love in late-colonial princely India". In Towheed, Shafquat (ed.). New Readings in the Literature of British India, c. 1780-1947 (इंग्रजी भाषेत). Columbia University Press. pp. 193–209. ISBN 978-3-8382-5673-3.
- ^ Poddar, Abhishek; Gaskell, Nathaniel; Pramod Kumar, K. G; Museum of Art & Photography (Bangalore, India) (2015). "Catalogue". Maharanis: women of royal India (English भाषेत). Ahmedabad: Mapin Publishing. pp. 75–105. ISBN 978-93-85360-06-0. OCLC 932267190.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ Sujata Nahar (1997). Mother's chronicles - Book 05. INSTITUT DE RECHERCHES EVOLUTIVES, Paris and Mira Aditi, Mysore. ISBN 81-85137-28-5.
- ^ श्रीअरविंद. "महाराणी चिमणाबाई यांना लिहिलेले पत्र". अभीप्सा (मराठी मासिक). ऑगस्ट २०१८.
- ^ "Maharani Chimnabai II - Raja Ravi Varma". Google Arts & Culture (इंग्रजी भाषेत). 2023-03-29 रोजी पाहिले.