चिन्मयी सुमीत
चिन्मयी सुमीत | |
---|---|
चिन्मयी आणि सुमीत राघवन | |
जन्म | चिन्मयी रवींद्र सुर्वे २३ सप्टेंबर, १९७० धारवाड |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेत्री |
भाषा | मराठी |
प्रमुख नाटके | ज्वालामुखी |
प्रमुख चित्रपट | मुरांबा |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | जीव झाला येडापिसा |
पुरस्कार | फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार |
वडील | रवींद्र सुर्वे |
आई | सुशील सुर्वे |
पती | सुमीत राघवन (ल. १९९६) |
अपत्ये | २ |
धर्म | हिंदू |
चिन्मयी सुमित या एक मराठी अभिनेत्री आहेत. त्या मराठी नाटके, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट तसेच दूरचित्रवाहिनी मालिकात काम करतात.
चिन्मयी सुमीत यांचा जन्म रवींद्र सुर्वे आणि सुशील सुर्वे यांच्या पोटी 23 सप्टेंबर १९७० रोजी झाला.[१] त्यांचे वडील रवींद्र सुर्वे हे साहित्यिक तथा पुण्याचे माजी आयुक्त असून आई सुशील सुर्वे या मानसोपचार तज्ज्ञ आहेत. चिन्मयी सुर्वे या मुळच्या औरंगाबादच्या होत्या.[२] मुंबई येथे 'ज्वालामुखी' या नाटकात काम करत असताना त्यांची सुमित राघवन यांच्याशी ओळख झाली. अल्पकालावधीत त्यांची चांगली मैत्री झाली. सुमित राघवन हे सुरेश वाडकर यांच्या कडून गाणे शिकत असत. सुमीत यांचा गोड आवाज चिन्मयी यांच्या मनाला भावला. कालांतराने मैत्रीच रूपांतर प्रेमात झालं. एक दिवस सुमित राघवन यांनी गाणं गाऊन चिन्मयी यांना प्रपोज केलं आणि ८ जून १९९६ रोजी ते दोघे विवाहबद्ध झाले.[३]
अभिनय सूची
- जीव झाला येडापिसा (टीव्ही मालिका २०१९-२०२१) - चंद्रकांता (आत्याबाई) देशमाने
- 'आई' एम सिंगल (लघुपट २०१९) - आई
- स्माईल प्लिज (चित्रपट २०१९) -
- मलाल (हिंदी चित्रपट २०१९)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा (टीव्ही मालिका २०१९) - भीमाबाई
- प्रेमा तुझा रंग कसा? (टीव्ही मालिका २०१८)
- फास्टर फेणे (चित्रपट २०१७) - आई
- मुरांबा (चित्रपट २०१७) - आलोकची आई
- बन मस्का (टीव्ही मालिका २०१६) - मैत्रेयीची आई / अनघा
- पोर बाजार (चित्रपट २०१४)
- हृदयनाथ (चित्रपट २०१२) - माई
- चेकमेट (चित्रपट २००८) - सुलोचना महाबळ
- आम्ही असू लाडके (चित्रपट २००५)
- दे धमाल (टीव्ही मालिका २००१)
- नीलांबरी (चित्रपट १९९५)
- भरला हा मळवट रक्तानं (चित्रपट १९९३) - मुक्ता तेलीन
- जसा बाप तशी पोरे (चित्रपट १९९१)
पुरस्कार
संदर्भ
- ^ "Chinmayee Surve". bookmyshow.
- ^ "'देवाणघेवाणीतून समृद्धता' (चिन्मयी सुमित राघवन)". सकाळ. २९ सप्टेंबर २०२० रोजी मूळ पान पासून संग्रहित. ५ मे २०२२ रोजी पाहिले.
- ^ "चिन्मयी आणि सुमीत यांचा मैत्रीपासून लग्नापर्यंतचा प्रवास". bookmyshow. ४ मे २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ५ मे २०२२ रोजी पाहिले.
- ^ Chinmayee Sumeet - Best Actor in Supporting Role Female Nominee | Filmfare Awards
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील चिन्मयी सुमीत चे पान (इंग्लिश मजकूर)