चित्रलेखा (साप्ताहिक)
चित्रलेखा | |
---|---|
प्रकार | |
भाषा | मराठी |
पहिला अंक | इ.स. १९५० |
देश | भारत |
मुख्यालय | मुंबई |
संकेतस्थळ | http://www.chitralekha.com/cm.php |
चित्रलेखा हे एक मराठी साप्ताहिक आहे. हे मुंबईहून ‘चित्रलेखा ग्रुप’ तर्फे प्रकाशित होते. १९५० साली हे साप्ताहिक पहिल्यांदा प्रकाशित केले गेले. ते गुजराती भाषेतूनही प्रसिद्ध होते. दोन्ही भाषेत ह्या साप्ताहिकाने आपापल्या प्रांतात ‘सर्वात जास्त खपाचे साप्ताहिक’ म्हणून लौकिक प्राप्त केला आहे. हे साप्ताहिक अमेरिकेत आणि कॅनडातही प्रकाशित होते. ह्या साप्ताहिकात ताज्या घडामोडींचा वेध घेतला जातो तसेच दर्जेदार कथा, कविता आणि व्यंगचित्रेही प्रसिद्ध केली जातात. मान्यवरांच्या मुलाखतींचाही ह्या साप्ताहिकात वेळोवेळी समावेश केला जातो.[१]
संदर्भ
- ^ "चित्रलेखा मराठी साप्ताहिक | chitralekha marathi magazine | M4मराठी". m4marathi.in. 2019-01-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-01-19 रोजी पाहिले.