चित्रपटविषयक पुस्तके
१९४० आणि १९५० च्या दशकांत "न्यू थिएटर‘, "बॉम्बे टॉकीज्‘, "रणजीत‘, "मिनर्व्हा‘,"हंस‘ या चित्रसंस्थांनी उत्कृष्ट सिनेमे रसिकांपुढे आणले. त्यानंतर सिनेमाविषयक लेखनाचा दर्जा सुधारत चित्रपटाच्या तंत्राची माहिती वाचायला मिळू लागली. नियतकालिकांमधून परीक्षणे, मुलाखती यांचे सत्र सुरू झाले. सिनेमाचा इतिहास, त्यातले बारकावे, तरलता, संदेश आणि तंत्र हे सामान्य रसिकांपर्यंत पोचवणारी चित्रपट व्यवसायावरील पुस्तके लिहिली जाऊ लागली. अशा पुस्तकांची ही जंत्री :-
हिंदी-मराठी चित्रपट आणि त्यांच्याशी संबंधित आठवणी आणि कलावंतांची चरित्रे/आत्मचरित्रे आणि अन्य पुस्तके==
आत्मचरित्रे
- अनंत आठवणी (अनंत माने)
- कऱ्हेचे पाणी (आचार्य अत्रे)
- उषःकाल (उषा किरण)
- संध्याकाळ (गजानन जागीरदार)
- माझा जीवनविहार (गोविंदराव टेंबे)
- माझा जीवनव्यासंग (गोविंदराव टेंबे)
- अजून त्या झुडपांच्या मागे (दशरथ पुजारी)
- एका सोंगाड्याची बतावणी (दादा कोंडके)
- मी दुर्गा खोटे (दुर्गा खोटे)
- पाटलाचा पोर (दिनकर द. पाटील)
- स्वर आले जुळुनी (प्रभाकर जोग)
- चित्र आणि चरित्र (बाबूराव पेंढारकर)
- छिन्नी-हातोड्याचे घाव (राम कदम)
- विनोदवृक्ष (वसंत शिंदे)
- एक झाड दोन पक्षी (विश्राम बेडेकर)
- शांतारामा (व्ही. शांताराम)
- चंदेरी दुनियेत (लीला चिटणीस)
- जसं घडल तसं (श्रीकांत ठाकरे)
- माझ्या जीवनाची सरगम (सी. रामचंद्र)
- धाकटी पाती (सूर्यकांत)
- स्नेहांकिता (स्नेहप्रभा प्रधान)
- सांगत्ये ऐका (हंसा वाडकर)
चरित्रे
अन्य पुस्तके
- चंदेरी सोनपावलं (चित्रपटविषयक लेखसंग्रह, सुभाषचंद्र जाधव)
- मराठी चित्रपटसृष्टीचा समग्र इतिहास (रेखा देशपांडे)
(अपूर्ण)