चिंतामण श्रीधर कर्वे
डॉ. चिंतामण श्रीधर कर्वे (जन्म : २५ डिसेंबर १९१४) हे एक मराठी विज्ञानलेखक होते. ’ध्रुवीय प्रकाश’ या त्यांनी लिहिलेल्या मराठी विश्वकोशातील लेखाखेरीज तेथे त्यांचे आणखीही काही लेख आहेत.
चिं.श्री. कर्वे हे ठाण्याच्या सरस्वती मंदिर ट्रस्ट संचालित सरस्वती सेकंडरी स्कूलचे संस्थापक विश्वस्त होते. मुंबईतील ’साउथ इंडियन एज्युकेशन सोसायटी’च्या SIES महाविद्यालयाचे ते निवृत्त प्राचार्य होते.
मुंबईची मराठी विज्ञान परिषद ही १९६७पासून दरवर्षी ’चिं.श्री. कर्वे विज्ञान निबंध स्पर्धा’ घेते. ही स्पर्धा विद्यार्थी गट आणि खुला गट या दोघांसाठी स्वतंत्र असते.
चिं. श्री. कर्वे यांनी लिहिलेली काही पुस्तके
- अग्निबाण
- अ्णुशक्ती शाप की वरदान
- अणूकडून अनंताकडे
- चला अन्य ग्रहांवर
- चला चंद्राकडे
- चला चंद्रावर स्वारी करू या
- जीवन वि विज्ञान
- जीवन, विज्ञान आणि तत्त्वज्ञान
- ज्योतिष
- तारकांची नवलनगरी
- नवविज्ञानाच्या परिसरात, भाग १, २.
- नवी विज्ञान क्षितिजे
- निळे आकाश
- बालचंद्र
- मानवाचे भवितव्य
- वास्तव -विज्ञानाचा श्रीगणेशा
- विराट विश्वाची निर्मिती (भाषांतरित, मूळ लेखक : जॉर्ज गॅमॉव)
- विज्ञानाचे विधाते, भाग १ ते ३.
- सूर्य : जन्म आणि मृत्यू (भाषांतरित, मूळ लेखक : जॉर्ज गॅमॉव)
- हवेच्या विश्वात
- A second course in elementary physics : For inter science ...