Jump to content

चिंचखेडा

  ?चिंचखेडा

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरजाफ्राबाद
विभागऔरंगाबाद
जिल्हाजालना
तालुका/केजाफ्राबाद
लोकसंख्या
लिंग गुणोत्तर
२,०८७ (२०११)
९३६ /
भाषामराठी, हिंदी

चिंचखेडा हे जालना जिल्ह्याच्या जाफ्राबाद तालुक्यातील एक गाव आहे. ते जाफ्राबाद या तालुक्याच्या गावापासून साधारणपणे १७ कि.मी. अंतरावर आहे.

लोकसंख्या

चिंचखेडा येथे इ.स. २०११च्या जनगणनेनुसार ४१९ कुटुंबे असून एकूण लोकसंख्या २,०८७ आहे, पैकी पुरुष १,०७८ तर स्त्रिया १,००९ आहेत.. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या ३०१ (मुलगे १५९ तर मुली १४२) असून ते प्रमाण एकूण लोकसंख्येच्या १४.४२ % आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या ६६५ (३१.४३%) असून त्यात ३२७ पुरूष व स्त्रिया ३२९ आहेत तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या केवळ २ (०.१०%) असून त्यात १ पुरूष व १ स्त्री आहे.[]

साक्षरता

  • एकूण साक्षर लोकसंख्या: ७३.५२%
  • साक्षर पुरुष लोकसंख्या: ८४.९८%
  • साक्षर स्त्री लोकसंख्या: ६१.३६%

ग्रामसंसद

  • ग्रामपंचायत सदस्य संख्या -
  • एकूण मतदार -

शैक्षणिक सुविधा

  • जिल्हा परिषद प्रशाला, चिंचखेडा (माध्यमिक)

आरोग्य केंद्र

गावात वैद्यकिय व आरोग्य केंद्रे उपलब्ध नाहीत. तालुक्याच्या ठिकाणी येथील नागरिक वैद्यकिय सुविधा घेतात.

  • अंगणवाडी — २

पिण्याचे पाणी

  1. सार्वजनिक विहिरी — ४
  2. खाजगी विहिरी —
  3. बोअर वेल — १
  4. हातपंप — ४
  5. पाण्याची टाकी — २
  6. नळ योजना —
  7. स्टॅंडपोस्ट —
  8. नळ कनेक्शन —
  9. वाटर फिल्टर —

नद्या व तलाव

गावातून दोन नद्या वाहतात व एक तलाव सुद्धा आहे. यामुळे पाण्याचे पाणी व शेतीसाठीचे पाणी यांचे प्रमाण व उपलब्धता वाढली आहे.

स्वच्छता

चिंचखेडा हे स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर आहे. गावात कुठेही उघडी गटारव्यवस्था उपलब्ध नाहीत.

हगनदारी मुक्त

गावात जवळजवळ ६०% जणांनी शौचालये बांधलेली आहे.

संपर्क व दळणवळण

गावात दूरध्वनी उपलब्ध असून मोबाईल टॉवर ही उभारण्यात आले आहे. गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. गावात ऑटोरिक्षा, टॅक्सी व व्हॅन उपलब्ध आहे.

बाजार

गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध नाही.

लोकजीवन

या गावात विविध जाती - धर्माचे लोक राहतात. त्यात प्रामुख्याने मराठा, बौद्ध, मुस्लिम, राजपूत, चांभार, मांग इत्यादी समाज प्रामुख्याने आहेत.

कामगार

  • एकूण कामगार – १,२४० (पुरुष - ६३१ व स्त्रिया - ६०९)
    • पैकी मुख्य कामगार - १,१५०
    • पैकी सामान्य कामगार - ९० (पुरुष - ४२ व स्त्रिया - ४८)

धार्मिक स्थळे

गावात अनेक धार्मिक स्थळे आहेत. त्यात शिव मंदिर, हनुमान मंदिर, बुद्ध विहार व मशिद ही प्रमुख धर्मस्थळे आहेत.

आरोग्य

गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात दोन अंगणवाड्या (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहेत.

गावात क्रिंडागण उपलब्ध आहे. गावात खेळ/करमणूक केंद्र उपलब्ध नाही. सर्वात जवळील खेळ/करमणूक केंद्र ७ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही. सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र ९ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.

गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध आहे. गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे.

वीज

प्रतिदिवस १८ तासांचा वीजपुरवठा घरगुती वापरासाठी, शेतीसाठी व व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे.

उत्पादन

खडकदेवळा या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या क्रमाने): अदरक, मिरची, सोयाबीन, मका , कापूसगहू.

संदर्भ

हे ही पहा

  • खासगांव