Jump to content

चिंकी यादव

चिंकी यादव
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव चिंकी मेहताबसिंग यादव
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थानभारत
जन्मदिनांक २६ नोव्हेंबर, १९९७ (1997-11-26) (वय: २६)
जन्मस्थानभोपाळ, मध्य प्रदेश
खेळ
देशभारत
खेळनेमबाजी
खेळांतर्गत प्रकार २५ मीटर पिस्तूल
प्रशिक्षक जसपाल राणा
कामगिरी व किताब
सर्वोच्च जागतिक मानांकन
वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी


चिंकी यादव (२६ नोव्हेंबर १९९७, भोपाळ, मध्य प्रदेश) ही एक भारतीय नेमबाज आहे. ती २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत भाग घेते. []तिने २०१९ च्या आशियाई नेमबाजी स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरून २०२० च्या उन्हाळी ऑलिम्पिकसाठी भारताकरता कोटा मिळवला.[] मार्च २०२१ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत चिंकीने २५ मीटर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्याच राही सरनोबत आणि मनू भाकर यांना हरवत सुवर्ण पदक पटकावले.[] याच स्पर्धेत राही सरनोबत आणि मनू भाकर यांच्यासह तिने २५ मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.[]

सुरुवातीचे आयुष्य आणि वैयक्तिक जीवन

यादवचा जन्म मध्य प्रदेशातील भोपाळ येथे २६ नोव्हेंबर १९९७ रोजी झाला. तिचे कुटुंब तात्या टोपे नगर क्रीडा संकुलाच्या आवारात एका खोलीत वसतिगृहात राहत होते.[] तिचे वडील मेहताबसिंग यादव तिथे इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होते. यादव तिच्या वडिलांसोबत कॉम्प्लेक्समधील शूटिंगच्या रेंजवर जात असे. २०१२ मध्ये तिने या खेळामध्ये कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला. तिने जसपाल राणा यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेश शूटिंग अकादमीत पिस्तूल शूटिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. तिचा धाकटा भाऊ राजेशने शॉटगन निवडली पण त्याने चिंकीइतक्या गंभीरपणे खेळात कारकीर्द घडवली नाही.[]

कारकीर्द

२०१५ मध्ये कुवेत शहरातील आशियाई नेमबाजी स्पर्धेत कनिष्ठ महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात चिंकी यादवने कांस्य पदक मिळवले.[] २०१६ मध्ये आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये २५ मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत कांस्यपदक तर सुहल येथे त्याच स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.[] तिने सुहल येथे २०१७ मध्ये आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मुस्कान आणि गौरी शेओरान यांच्यासह सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. []यादवने २०१९ च्या आशियाई एशियन नेमबाजी स्पर्धेच्या पात्रता फेरीत ५८८ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आणि ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. या कामगिरीमुळे २०२० उन्हाळी ऑलिम्पिकसाठी भारताला कोटा मिळाला कारण अंतिम फेरीतील आठ स्पर्धकांपैकी चार स्पर्धकांनी यापूर्वी या स्पर्धेसाठी कोटा मिळवला होता. ११६ गुणांसह तिने अंतिम फेरीत सहावे स्थान मिळवले.[][१०]

संदर्भ

  1. ^ "ISSF - International Shooting Sport Federation - issf-sports.org". www.issf-sports.org. 2021-03-27 रोजी पाहिले.
  2. ^ a b "One-room house to Olympic quota". The New Indian Express. 2021-03-27 रोजी पाहिले.
  3. ^ "ISSF World Cup: Chinki Yadav Wins Gold As India Sweep Medals In 25m Pistol Event | Shooting News". NDTVSports.com (इंग्रजी भाषेत). 2021-03-27 रोजी पाहिले.
  4. ^ Srinivasan, Kamesh (2021-03-25). "The Hindu" (इंग्रजी भाषेत). New Delhi. ISSN 0971-751X.
  5. ^ "One-room house to Olympic quota". The New Indian Express. 2021-03-27 रोजी पाहिले.
  6. ^ Nov 4, Ramendra Singh / TNN / Updated:; 2015; Ist, 23:01. "Bhopal's shooter wins bronze in Asian championship | More sports News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-03-27 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  7. ^ "India bag five more medals on day four of Junior Shooting World Cup; take tally to 23". Zee News (इंग्रजी भाषेत). 2016-09-21. 2021-03-27 रोजी पाहिले.
  8. ^ Bureau, Sports (2017-06-28). "The Hindu" (इंग्रजी भाषेत). SUHL (Germany). ISSN 0971-751X.
  9. ^ Nov 8, PTI / Updated:; 2019; Ist, 17:09. "Shooter Chinki Yadav bags India's 11th Olympic quota | More sports News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-03-27 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  10. ^ DelhiNovember 9, S. Kannan New; November 9, 2019UPDATED:; Ist, 2019 11:30. "Chinki Yadav fires Tokyo quota place". India Today (इंग्रजी भाषेत). 2021-03-27 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)