चाळीसगाव तालुका
?चाळीसगाव महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
हवामान तापमान • उन्हाळा | • ४५ °C (११३ °F) |
जिल्हा | जळगाव |
लोकसंख्या लिंग गुणोत्तर साक्षरता • पुरूष • स्त्री | ९७,५५१ (२०११) १.०८ ♂/♀ ८५.८८ % • ९०.४१ % • ८१.०२ % |
भाषा | मराठी |
विधानसभा मतदारसंघ | चाळीसगाव |
तहसील | चाळीसगाव |
पंचायत समिती | चाळीसगाव |
चाळीसगाव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.
चाळीसगाव शहराचे दोन मुख्य भाग आहेत - जुने शहर व नवे शहर. या दोन्हीच्या मधून तितूर नदी वाहते.
दळण वळण
चाळीसगाव हे लोहमार्ग व राज्य महामार्गांनी इतर शहरांशी जोडलेले आहे. हे भुसावळनजीक असलेले मध्य रेल्वेच्या मुंबई-दिल्ली मार्गावरील एक जंक्शन आहे. चाळीसगाववरून धुळे येथे जाण्यासाठी रेल्वेचा फाटा फुटतो. चाळीसगाव हे एक महत्त्वाचे स्थानक असल्याने येथे बहुतेक सर्व रेल्वेगाड्या थांबतात. मुंबई व पुणे येथून अंदाजे सात तासांच्या अंतरावर आहेत. जळगाव, नासिक, औरंगाबाद व धुळे ही शहरे येथून साधारणतः समान अंतरावर आहेत.
भूगोल
चाळीसगाव महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात नैर्ऋत्य दिशेस आहे. चाळीसगावच्या उत्तरेस धुळे जिल्हा व पारोळा तालुका, पश्चिमेस नासिक जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा तर पूर्वेस पाचोरा व भडगाव तालुके आहेत. चाळीसगाव डोंगरी व तित्तूर या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या नद्या पुढे गिरणाला मिळतात. गिरणा पुढे अरबी समुद्रास मिळणाऱ्या तापी नदीस मिळते.
पर्यटन
चाळीसगावच्या दक्षिणेस सातमाळा नावाची डोंगराची रांग आहे. अजिंठा व वेरूळ ही चाळीसगावच्या जवळची प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. अन्य पर्यटनस्थळांत पाटणादेवी व पितळखोरे लेणी ही वाखाणण्याजोगी आहेत. पाटणादेवी मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैली शैलीत मोडते. तसेच बहाळ कजबे येथील श्री.राम यांनी निवास केलेले व श्री राम यांच्या हस्ते स्थापित श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिर व पुरातन काळातील पाऊल खुणा व किल्ले आहेत चाळीसगाव शहराच्या मध्यवर्ती असलेले सौंदर्यशैलीत भर घालणारा, हिंदू मुसलमान एकीचे प्रेम जपणारा व बंधुभावाची शिकवण देणारा पिरमुसा कादरीबाबाचा दर्गा येथे आहे.
केकी मुस यांचे कलादालन चाळीसगाव येथे चाळीसगाव रेल्वे स्थानक परिसरात आहे. केकी मूस हे एक पारसी गृहस्थ होते. त्यांनी त्यांचे आयुष्य एका छताखाली व्यथित करुण अनेक कलांना जन्म दिलेला आहे. टेबल टॉप फोटोग्राफी हा त्यांनीच केलेला आविष्कार आहे. त्याबाबत जागतिक लेवल चे पुरस्कार त्यांना मिळाले होते. राम सुतार यांनी बनवलेले सुबक मूर्ती तेथे आहे. तेथील सर्वच कलाकृती एकदा जाऊन बघण्या सारख्या आहे.
उद्योग
इथे कृषी उत्पन्नावर आधारित बेलगंगा साखर कारखाना, चाळीसगाव कापड गिरणी, तेल व विड्यांचे कारखाने इ. इतर उद्योगांना चालना देण्याकरता इथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे चाळीसगाव उद्योग क्षेत्र आहे. तसेच मक्यावर प्रक्रिया करून स्टार्च, लिक्विड ग्लुकोज बनविण्याचा कारखाना सुद्धा उभारण्यात आला आहे.
कृषी
चाळीसगाव व जवळपासच्या भागात शेती हा मुख्य धंदा आहे. ऊस, कपाशी व केळी ही मुख्य रोख पिके आहेत. येथे भुईमुगाचीही लागवड होते. ज्वारी, बाजरी व गहू ही धान्येही घेतली जातात. बहुतांश शेती जिरायती आहे. चाळीसगाव तालुक्यात लिंबू उत्पादन मोठ्या प्रमाणात होते।
प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे
- केकी मूस
- प्रतिभाताई पाटील
चाळीसगाव तालुक्यातील गावे
मुंदखेडे बु पिंपळवाड म्हाळसा, दस्केबर्डी, शिदवाडी, मेहुणबारे,खडकीसिम, कढरे, पळासरे, दरेगाव, लोंढे, जामदा, खेडगाव,धामणगाव, पिलखोड, खडकी (चाळीसगाव तालुका), हिरापूर, तळेगाव, रोहिणी, पिंपळगाव (राजदेहरे), राजदेर तांडा, गंगाश्रम, हिंगणे, शिंदी, घोडेगाव, ओढरे, जुनपाणी, पाटणादेवी, वालझिरी, पिंपरखेड, लांबे वडगाव, कजगाव, गोंडगाव, करगाव, भोरस, चीर्फळ, टाकळी (प्र. दे.), हातगाव, मालशेवगे, बेलदारवाडी, शामवाडी, पातोंडा, उंबरखेड, तांबोळे, तरवाडे, रोकडे,बहाळ, दहिवद, वाघळी, वडाला,वडाली सायगाव, मांदुर्णे पिंपळखेड, रांजणगाव ,बोरखेडा बु, देवळी, डोणदिगर (बेघर) पिंप्री खुर्द (परशुराम नगर), डोणदिगर, देशमुखवाडी, न्हावें, ढोमने, बोरखेडा (पिराचे)डामरुण पिंपरी बु।। प्र दे पोहोरे, शिवापूर
बाह्य दुवे
- Chalisgaon : Developement Potential and Challenges (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
- MIDC Chalisgaon Archived 2007-03-10 at the Wayback Machine.