Jump to content

चार्वाकदर्शन

चार्वाक हे एक प्राचीन भारतीय भौतिकवादी आणि नास्तिक दर्शन होते. चार्वाक हे नाव चारु (गोड) आणि वाक् (वाणी) या शब्दांच्या संधीपासून तयार झाले आहे असे मानले जाते. चार्वाक नावाची कोणी व्यक्ती असावी, असा एक समज आहे.

चार्वाक तत्त्वज्ञान हे सर्वनिर्मूलवादी, अनीश्वरवादी, जडवादी व भौतिकवादी पण जीवनातील प्रत्यक्ष अनुभवाशी नाते सांगणारे आहे. ही विचारपरंपरा वेदांइतकीच प्राचीन आहे. तिचे खरे नाव लोकायतिक, ‘लोकायत’ किंवा ‘बार्हस्पत्य मत’ (बृहस्पतिप्रणीत विचार) असे आहे.