Jump to content

चारुशीला साबळे

चारुशीला साबळे वाच्छानी
जन्मचारुशीला साबळे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी
वडीलशाहीर साबळे
आई भानुमती बनसोडे
पतीअजित वाच्छानी
अपत्ये त्रिशाला वाच्छानी, योहाना वाच्छानी

चारुशीला साबळे ह्या एक मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आहेत. शाहीर साबळे आणि भानुमती बनसोडे या जोडप्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. देवदत्त साबळे, वसुंधरा आणि यशोधरा ही त्यांची भावंडे असून संपूर्ण साबळे कुटुंब हे लोककलेला वाहिलेलं आहे.[]

हिंदी चित्रपट अभिनेते अजित वाच्छानी सोबत त्यांचा विवाह झाला. त्यांना त्रिशाला आणि योहाना अशा दोन मुली झाल्या. त्रिशाला हवाई सुंदरी असून योहाना ह्या एक अभिनेत्री म्हणून आपली कारकीर्द सांभाळत आहेत.[]

इ.स. १९८७ मधील गंमत जंमत या मराठी चित्रपटातील त्यांची अशोक सराफ सोबतची जोडी आणि किशोर कुमारअनुराधा पौडवाल यांनी यांनी गायलेले गाणे 'अश्विनी ये ना' ये त्यांना चांगलीच ओळख देऊन गेले.[][]

चित्रपट सूची[]

  • प्रियतमा (२०१४) - परश्याची आई
  • मी सिंधुताई सपकाळ (२०१०) - सिंधूची आई
  • गांव तसं चांगलं (२००८) - रुक्मिणी शाहजी पवार
  • लपुन छपून (२००६)
  • भस्म (१९९४) परे
  • माहेरची साडी (१९९१) - लक्ष्मीची शेजारीण
  • तुझी माझी जमली जोडी (१९९०) - मेरी
  • अंजाने रिश्ते (१९८९) - इंदू मोहन
  • कयामत से कयामत तक (१९८८) - पार्वती
  • गंमत जम्मत (१९८७) - अश्विनी पी. वडके
  • ये कहाणी नइ(१९८४)
  • लक्ष्मीची पाऊले (१९८२)

संदर्भ

  1. ^ "साबळे शाहीर". ६ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "trivia" (इंग्रजी भाषेत). ६ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "Exclusive! Sachin Pilgoankar shares a personal anecdote about Kishore Kumar's first Marathi song 'Ashwini Ye Na'" (इंग्रजी भाषेत). ६ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ "'अश्विनी ये ना...' गाण्याची पुन्हा एकदा धूम". ६ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  5. ^ "Charusheela Sabale" (इंग्रजी भाषेत). ६ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील चारुशीला साबळे चे पान (इंग्लिश मजकूर)