Jump to content

चारमिनार एक्सप्रेस

चारमिनार एक्सप्रेसचा फलक
चारमिनार एक्सप्रेसचा मार्ग नकाशा

चारमिनार एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची चेन्नईहैदराबाद ह्या शहरांदरम्यान धावणारी जलद प्रवासी रेल्वेसेवा आहे. दक्षिण मध्य रेल्वेद्वारे चालवली जात असलेली चारमिनार एक्सप्रेस चेन्नई सेंट्रल व हैदराबाद ह्या स्थानकांदरम्यान दररोज धावते. तमिळनाडू, आंध्र प्रदेशतेलंगणा ह्या राज्यांमधून धावणारी चारमिनार एक्सप्रेस चेन्नई ते हैदराबाद दरम्यानचे ७९० किमी अंतर सुमारे १४ तासात पार करते. ह्या गाडीला हैदराबादेतील प्रसिद्ध वास्तू चारमिनारचे नाव देण्यात आले आहे. चारमिनार एक्सप्रेस ट्रेन ही भारत देशाचे दक्षिण मध्य रेल्वेची अतिशय प्रतिष्ठित व प्रसिद्ध ट्रेन आहे.[] ही चेन्नई ते हैद्राबाद दरम्यान दररोज धावनारी सुपर फास्ट एक्सप्रेस आहे.[]

इतिहास

१५ व्या शतकात हैदराबाद मध्ये फार मोठी प्लेगाची साथ आली होती. त्या साथिला तेथे अटकाव करून ती नेस्तनाबूत केली त्याच्या स्मरणार्थ भव्य चारमिनार असणाऱ्या चार मीनारचे बांधकाम झाले होते तेच चार मीनार हे नाव या ट्रेनला दिलेले आहे.

इंजिन आणि बोगी

या ट्रेनला २४ डबे आहेत. त्यात १ AC/2AC कॉम्बो, २ 2AC, २ 3AC, १४ स्लीपर, ३ सामान्य, २ SLR, बोगी आहेत. ही ट्रेन LGD WAP4 / WAP7 या इंजिनचे मदतीने नियमित धावते. या ट्रेनचे दोन्ही स्टेशनचे दरम्यान १५ थांबे आहेत. शिवाय देशातील कांही मोजक्याच ट्रेनना GPS सुविधेसह CBC (सेंटर बफर कपलिंग) व्यवस्था आहे त्यापैकि ही एक ट्रेन आहे. CBC व्यवस्था असणारी देशातील ही पहिली ट्रेन आहे तसेच दक्षिण मध्य रेल्वेची २४ बोगी असणारी पहिली ट्रेन आहे.

वेग

ही ट्रेन ताशी सरासरी ५७ किमी धावते आणि पूर्ण प्रवास सरासरी १३ तास व ५० मिनिटात करते.

सुविधा

या ट्रेनला मोठ्या खिडक्या आहेत. सामान व्यवस्था सीटचे खाली तांत्रिक पद्दतीची आहे. गंतव्य आणि आगमन या दोन्ही स्थानकाशी इतर बऱ्याच ट्रेन मार्गांची साखळी आहे.[]

वेळापत्रक

  • १२७५९ चारमिनार एक्सप्रेस चेन्नईहून संध्याकाळी ६:१० वाजता निघते व हैदराबादला दुसऱ्या दिवशी सकाळी ८:०० वाजता पोचते.
  • १२७६० चारमिनार एक्सप्रेस हैदराबादहून संध्याकाळी ६:३० वाजता निघते व चेन्नईला दुसऱ्या दिवशी सकाळी ८:१५ वाजता पोचते.[]
ट्रेन क्रं. गंतव्य स्थानक वेळ आगमन स्थानक वेळ शेरा
12759 चेन्नई सेंट्रल(1) 18:10:00 हैद्राबाद डेक्कन 08:00:00 दूसरा दिवस
12760 हैद्राबाद डेक्कन(2) 18:30:00 चेन्नई सेंट्रल 08:15:00 दूसरा दिवस

थांबे

चारमिनार एक्सप्रेस गुडुर, नेल्लोर, ओंगोले, तेनाली, विजयवाडा, खम्मम, वारंगळ व सिकंदराबाद ह्या स्थानकांवर थांबते.[]

संदर्भ

  1. ^ "चारमीनार एक्सप्रेस हिस्ट्री".
  2. ^ "12759/चारमीनार सुपर फ़ास्ट एक्सप्रेस".
  3. ^ "इंडियन रेलवेज पैसेंजर रिजर्वेशन इन्क्वारी".
  4. ^ "चारमीनार एक्सप्रेस टाइम-टेबल". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-12-12 रोजी पाहिले.
  5. ^ "चारमीनार एक्सप्रेस हॉल्टस".

बाह्य दुवे