चारभिंती हुतात्मा स्मारक
सातारा शहरात मध्यवर्ती ठिकाणी 'चारभिंती' हे एक हुतात्मा स्मारक आहे. हे एक पर्यटनस्थळसुद्धा आहे. साताऱ्यातील प्रमुख ठिकाणांचा विचार केला तर चारभिंती हे ऐतिहासिक वारसा असलेले एक प्रेक्षणीय हुतात्मा स्मारक आहे. सातारा शहरातील 'अजिंक्यतारा' किल्ल्याजवळ हे स्मारक आहे. या स्मारकाच्या खालील बाजूस आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था रयत शिक्षण संस्था यांचे कार्यालय आहे .[१]
इतिहास
या स्मारकाचा ऐतिहासिक वारसा पहिला तर, छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी १८३० साली या ठिकाणाची निर्मिती केली होती. पूर्वीपासून मराठ्यांची राजधानी असल्यामुळे विजया दशमीच्या दिवशी सातारा येथून छत्रपतींची मिरवणूक काढतात. ही मिरवणूक राजघराण्यातील स्त्रीयांना पाहता यावी म्हणून या 'चार भिंती'ची निर्मिती केली. या ठिकाणाला 'नजर महाल' म्हणून पण संबोधले जायचे. नंतर १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येथे स्मारकाची उभारणी झाली.या स्मारकात नावाप्रमाणे चारही बाजूंनी भिंती आहेत,मधोमध एक स्तंभआहे ज्यावर हुतात्म्यांच्या आठवणीमध्ये कोनशीला घडवल्या आहेत. या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई,तात्या टोपे,रंगो बापूजी गुप्ते यांची आठवण करून देणाऱ्या कोनशीला बघायला मिळतात. इंग्रजांच्या विरुद्ध पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या १०० वर्षपूर्तीला याचे बांधकाम करण्यात आले.२००१ साली या स्मारकाचे नूतनीकरण करण्यात आले. अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाताना आपण हे स्मारक पाहू शकतो. या ठिकाणहून सातारा शहराचे दृश्य आपण जवळून बघू शकतो.[२]
सातारा व आसपासच्या तरुणवर्गाचे या चारभिंतीबद्दल आकर्षण दिसून येते. आसपासच्या परिसरात राहणारे लोक येथे रोज फिरायला येताना दिसतात.
संदर्भ
- ^ "Rayat Shikshan Sanstha Founder Dr. Karmaveer Bhaurao Patil, Established-1919". rayatshikshan.edu. 2021-02-27 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2018-02-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-07 रोजी पाहिले.