चार वाणी
नामस्मरण करताना आपल्याला चार वाणींचा आधार घ्यावा लागतो, त्या चार वाणी म्हणजे
1. वैखरी वाणी = जी आपण उच्चार करतो ती.
2. मध्यमा वाणी = जी आपण मंद मंद गुणगुणतो ती.
3. पश्यन्ती वाणी = नामस्मरण साधनेतील स्मरण निजध्यासन अवस्था म्हणजे पश्यन्ती वाणी होय यात साधक इंद्रियांच्या क्षुद्र आनंदाकडे खेचला जात नाही.
4. परा वाणी = या वाणीत साधक जास्तवेळ थांबुशकत नाही, पश्यन्ती वाणीतून साधक वीज चमकावी तसा परावाणीत पुन्हा पुन्हा प्रवेश करून पुन्हा पुन्हा पश्यन्ती वाणीत परततो काही वेळा ती अवस्था तीव्र आंदोलीत होते त्या वेळी साधकाला अंतःकरणातील भगवंताचे काही क्षण का होईना दर्शन होते. त्या दर्शन होण्यालाच
"देवाचीये द्वारी उभा क्षणभरी ।"
असे संत ज्ञानेश्वर माऊलींनी संबोधले आहे.