Jump to content

चाफा बोलेना (गीत)

"चाफा बोलेना"
भावगीत by लता मंगेशकर
भाषामराठी
इंग्रजी नाव Chhafa Bolena
लेखक/ कवी नारायण मुरलीधर गुप्ते
Composer(s) वसंत प्रभू

चाफा बोलेना हे कवी बी उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते यांचे गीत आहे. प्रचंड लोकप्रियता मिळवलेले हे भावगीत लता मंगेशकर यांनी गायले होते तर वसंत प्रभू यांनी त्याला संगीत दिले होते.[]

लोकप्रियता

पूर्वी आकाशवाणीवर हे भावगीत नेहमी वाजवले जात असे. या गीताचा समावेश मराठी गीतांच्या वाद्यवृंदात बऱ्याचदा असतो. सुगम गायनाच्या क्षेत्रात करीअर करू पाहणाऱ्या प्रत्येक गायिकेने हे गीत गायले आहे, असे म्हणले जाते.

कवी बी,  गायिका लता मंगेशकर आणि संगीतकार वसंत प्रभू या तिघांच्या मेहनतीने या गीताने प्रचंड लोकप्रियता मिळवली. []

समीक्षण

या गाण्याचे कौतुक करताना लोकसत्ता या दैनिकात विनायक जोशी लिहतात,

साधे, सोपे शब्द, मन खेचून घेणारी चाल, लतादीदींचा मधुर आवाज, व्हायोलिन- क्लॅरोनेट- मेंडोलिन- पियानो- बासरी असा वाद्यमेळ, तबला- ढोलक यांचा ताल असे सारेच रसायन या गाण्यात उत्कृष्ट जमून आले आहे. आपण ही फक्त कविताच वाचली तर रूढार्थाने ‘मीटर’मध्ये नसलेले हे काव्य आहे. संगीतकार वसंत प्रभूंसारखा ‘मेलडी किंग’ हा सारा मामला जणू मधाळ करतो.[]


शब्द

चाफा बोलेना, चाफा चालेना

चाफा खंत करी, काही केल्या फुलेना

गेले आंब्याच्या बनी, म्हटली मैनासवे गाणी

आम्ही गळयांत गळे मिळवुन रे

गेले केतकीच्या बनी, गंध दरवळला वनी

नागासवे गळाले देहभान रे

चल ये रे, ये रे गडया, नाचु उडु घालु फुगडया

खेळू झिम्मा झिम् पोरी झिम् पोरी झिम्

हे विश्वाचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण

उणे करु आपण दोघेजण

जन विषयाचे किडे, यांची धाव बाह्याकडे

आपण करु शुद्ध रसपान रे

चाफा फुली आला फुलून

तेजी दिशा गेल्या आटून

कोण मी चाफा, कोठे दोघे जण रे[]

संदर्भ

  1. ^ विभास, alka vibhas | अलका. "चाफा बोलेना | Chafa Bolena | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online". आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani. 2022-01-09 रोजी पाहिले.
  2. ^ a b "'चाफा बोलेना, चाफा चालेना..'". Loksatta. 2022-01-09 रोजी पाहिले.
  3. ^ "Chafa Bolena / चाफा बोलेना, चाफा चालेना - Marathi Songs's Lyrics". geetmanjusha (इंग्रजी भाषेत). 2022-01-09 रोजी पाहिले.