चाकण
चाकण | |
जिल्हा | पुणे |
राज्य | महाराष्ट्र |
लोकसंख्या | २१,९६३ इ.स. २००१ |
दूरध्वनी संकेतांक | ०२१३५ |
टपाल संकेतांक | ४१० ५०१ |
वाहन संकेतांक | महा - १४ |
चाकण हे पुणे जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. चाकण शहरानजीक प्रस्तावित विमानतळ होणार आहे. जवळच वेगाने विकास होणारी औद्योगिक महामडंळाचे कारखाने आहेत. शहरातुन नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग जातो. चाकन हे पुणे शहरापासून ३३ कि मी अंतरावर आहे. खेड हे तालुक्याचे ठिकाण आहे. ते चाकण पासून ११ कि मी आहे .
पुरातन चक्रेश्वर मंदिर, निसर्ग संपदा , पुरातन मंदिर या मंदिरा विषयी आनेक दंत कथा सांगितले जाते एक कथा रामायण मधील आहे पूर्वी चाकण चे नाव एकचक्र नगर होते इथे शांडिल्य ऋषी चा मोठा आश्रम होता इथे आग्नी होम हवन चाले पण आसुर यांना त्रास देत त्यावेळी राजा दशरथ राजा हा सुर्यवंशी यांचे राज्य होते. शांडिल्य ऋषी नी राजा दशरथ यांना विनंती केली की साधना करताना अडचणी येतात तेव्हा राजा दशरथ स्वतः आसुरा बरोबर युद्ध करून विजयी झाले होते पण याच युद्धात दशरथ राजाचे रथाचे चाकचे कन्हा तुटला व चाक पडूनये त्यासाठी राजा दशरथ यांची सारथी राणी कैकई होती तीन आपल्या हाताने चाकाला पडू दिले नाही युद्ध संपल्यावर चाक पडले या ठिकाणी म्हणुन या गावाला एकचक्र नगर असे नाव पडले आणि त्याचा अभ्रंश चाकण हे गाव आणि इथेच रामायण ला सुरुवात झाली ती अशी की दशरथाने कैकई राणीला काही मागायला सांगितले ते दोन वर नंतर मागून घेतले श्री रामाला वनवास आणि भरताला राज्य
दुसरी अशी कथा महाभारत मध्ये पांडव जेव्हा अज्ञातवासा मध्ये एकचक्र नगर इथे म्हणजेच चाकण ला राहिले होते त्या वेळी बकासुर या राक्षस ला मारले होते ती जागा येथून जवळ आळंदी रोड ला रोटाई तळे ईथे आहे
इथले महत्व मानभाऊ पंथ यांचा लिळा चरीत्र ग्रंथात लिहिले आहे त्याच प्रमाणे शिवलामृत पोथी मधील पाचवा आध्याय चे वर्णन येथील जागेशी मिळते जुळते आहे श्री ज्ञानेश्वर महाराज इथे येऊन गेले तुकाराम माराजांनी आपल्या गाथा या ठिकाणीं ठेवल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराज इथे येऊन पाहिले देवदर्शन केले आहे असा इतहास आहे संग्रामदुर्ग किल्ला, ते अगदी अलीकडे प्रचंड औद्योगिक विस्तारामुळे वाहन उद्योगांची पंढरी म्हणून नावलौकिक मिळालेल्या व मूलभूत सोयींचा विकास , प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-नाशिक लोहमार्ग हे प्रस्तावित प्रकल्प , राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र ,लोकसंखेच्या लोंढ्यानी वाढते नागरीकरण या कारणांमुळे पुणे जिल्ह्यातील चाकणचा चेहरा-मोहरा संपूर्ण पणे बदलतोय... औद्योगिकदृष्ट्या विस्तारत्या सुवर्ण त्रिकोणाचे तिसरे टोक म्हणून चाकण सह खेड तालुका विकसित होत आहे.... प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, चाकणमधील विस्तारती औद्योगिक वसाहत ,खेड तालुक्यातील सेझ आणि शासनाचे विविध विकास प्रकल्प यामुळे पुणे जिल्ह्यात उद्यमशील तालुका म्हणून खेड तालुका व चाकण परिसर ओळखला जाऊ लागला आहे... या भागाला पंचतारांकित परिसर म्हणून नावलौकिक मिळवून द्यायला शासनाचे विकासात्मक धोरणही कारणीभूत ठरत आहेत... . गेल्या २५- ३० वर्षातल्या चाकण ही बदलती स्थित्यंतरे अनुभवली आहेत ....
मागील काही वर्षांपर्यंत चाकण लगतचा नाणेकरवाडी, खराबवाडी, मेदनकरवाडी आदी परिसर सोडल्यास कुरुळी ,निघोजे, सावरदरी, शिंदे, वसुली, महाळुंगे, खालुंब्रे, वराळे, भांबोली, शिंदे, वासुली, बिरदवडी, आंबेठाण, चिंबळी आदी उद्योगीकरणात आलेल्या भागात आधुनिकेचं वारं शिवलं नव्हतं. सुपीक, काळी जमीन, ऊस आणि भुईमुगाचं पीक आणि धामिर्क यात्रांसाठी आणि एकेकाळी दगड आणि खाण यासाठी ते ओळखलं जाई. नंतर कारखानदारीला पोषक अशा तिथे उत्तम पायाभूत सुविधा एमआयडीसीने पुरवल्या. आता हा भाग ग्रामीण ढंग जोपासणारा व सर्वात कमी प्रदूषण आणि आधुनिक सोयी-सुविधांचा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. मोठमोठ्या कंपन्यांनी कारखानदारी थाटल्याने या परिसराला एक प्रकारची चमक आली आहे, पाणीपुरवठा, रस्ते यासारख्या पायाभूत सुविधा इथे आहेत आणि संपूर्ण हा परिसर चाकण आणि तळेगाव रोड यांना एकमेकांना जोडला गेला आहे. कामगार अधिकारी यांची वाढती संख्या पाहता महाळुंगे सारख्या भागात अनेक थ्री-बीएचके पासून रो हाऊसपर्यंत सर्व प्रकारची घरे गरजेनुसार निर्माण होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बजाज, मर्सिडीज बेंझ ,व्होक्स वेगन , महिंदा, केहीनफाय, यासारख्या नावाजलेल्या कंपन्या इथे आहेत. शिवाय अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनीही या भागात आपले युनिट्स स्थापन केले आहेत. एमआयडीसी टप्पा १ ते ५ मध्ये मागील वर्षाअखेरी पर्यंत ३ हजार ५९६ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे .शिवाय हा भाग मुंबई, नाशिक आणि पुणे या सुवर्ण त्रिकोणाच्या अगदी मध्यभागी येतो. महाळुंगे , महिंद्रा जवळून येथील एमआयडीसीतून जाणाऱ्या रस्त्यामुळे हा भाग सर्वत्र रूंद रस्त्यांनी तळवडे, निगडी पर्यंत जोडला गेला आहे. या भागाला रिअल इस्टेटमध्ये नाव मिळवून देण्यात एमआयडीसीचाही मोठा वाटा आहे. पुणे-नाशिक महामार्गावरचा औद्योगिक परिसर म्हणजे चाकण असा नाव लौकिक प्राप्त झाला आहे . नवे या भागात करण्याचे जवळपास मुख्यमंत्र्यांनी छातीठोक पणे सांगितल्याने विमानतळ तयार होण्याच्या विश्वसनीय व़ृत्तामुळे चाकण व खेड तालुका हे नाव चांगलेच चचिर्ले आले आहे. त्यातच देशभरात ज्या १७ ठिकाणांमध्ये सर्वात जास्त गुंतवणूक आकषिर्त करण्याची क्षमता आहे त्यात चाकणचा क्रमांक लागत असल्याने उद्योगीकरणाचे वारे येथे वेगाने वाहत आहे.
( संपादन : अविनाश लक्ष्मण दुधवडे, पत्रकार, मा.अध्यक्ष खेड तालुका पत्रकार संघ , जि.पुणे )
मो. ९९२२४५७४७५