चांदोबा (मासिक)
चांदोबा | |
---|---|
प्रकार | मासिक |
विषय | बालवाङमय |
भाषा | तमिळ, तेलुगू, मराठी व अन्य भारतीय भाषा |
संपादक | प्रशांत |
स्थापना | इ.स. १९४७ |
पहिला अंक | एप्रिल इ.स. १९५२ |
कंपनी | जिओडेसीक इन्फॉरमेशन सिस्टम |
देश | भारत |
मुख्यालय | मुंबई |
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
चांदोबा हे मराठीसह अनेक भाषांमध्ये निघणारे व बालसाहित्य असलेले मासिक आहे. या मासिकात लहान मुलांसाठी कथा व अन्य मनोरंजक साहित्य असते.
जुलै इ.स. १९४७ मध्ये सुरू झालेल्या चांदोबाची स्थापना नागीरेड्डी आणि चक्रपाणि यांनी केली. सुरुवातीला चांदोबा तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रकाशित होत होता. ६ आणे इतक्या किमतीच्या चांदोबाच्या सुमारे ६००० प्रती सुरुवातीला विकल्या जात होत्या. चक्रपाणि यांचे १९७५ मध्ये निधन झाल्यानंतर विश्वनाथ रेड्डी यांनी चांदोबाचे काम पाहण्यास सुरुवात केली. विश्वम या नावाने ते अजूनही चांदोबाचे संपादकीय काम पाहतात. हळूहळू १२ भाषांमध्ये प्रसिद्ध होऊ लागलेला चांदोबा लोकप्रिय होत होता. इ.स. १९८० मध्ये चांदोबाच्या सर्व भाषा मिळून सुमारे ९ लाख प्रती विकल्या गेल्या. इ.स. १९८० मध्ये नागीरेड्डी यांच्या थोरल्या मुलाचे - प्रसादचे - निधन झाल्यावर नागीरेड्डींना नैराश्याचा झटका आला. इ.स. १९९० च्या दशकात कामगारांच्या अडचणींमुळे काही कौटुंबिक तंट्यामुळे चांदोबाचे प्रकाशन काही काळ बंद करावे लागले. त्यावेळी चांदोबाची सहा लाख प्रतींची विक्री होती . नोव्हेंबर, इ.स. १९९९मध्ये विश्वम यांनी पुन्हा प्रकाशन सुरू केले आणि तेव्हापासून सर्व भाषांतील चांदोबाची प्रतिवर्षी २ लाख प्रतींची विक्री होते.