चांदवड तालुका
चांदवड तालुका चांदवड तालुका | |
---|---|
राज्य | महाराष्ट्र, भारत |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
जिल्हा उप-विभाग | चांदवड उपविभाग |
मुख्यालय | चांदवड |
क्षेत्रफळ | ९५८ कि.मी.² |
साक्षरता दर | ६०% |
तहसीलदार | प्रदीप पाटील |
लोकसभा मतदारसंघ | दिंडोरी (लोकसभा मतदारसंघ) |
विधानसभा मतदारसंघ | चांदवड विधानसभा मतदारसंघ |
आमदार | राहुल आहेर |
पर्जन्यमान | ५७० मिमी |
चांदवड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याचा एक तालुका आहे. द्राक्षे व टोमॅटो,कांदा येथील महत्त्वाचे पीक आहे.
विशेष
नाशिकहून ६० किलोमीटरवर मुंबई-आग्रा रोडलगत चांदवड शहरात प्रवेश करताच नजरेत भरणारा चांदवड किल्ला आपले स्वागत करतो. मुंबई-आग्रा रोडवरील घाटावर बांधलेला हा किल्ला पुणे, नाशिक, मुंबई व विदर्भात जाणारे सगळे रस्ते अडवून शत्रूची कोंडी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असे. म्हणूनच चांदवडच्या किल्ल्याबाबत असे म्हणले जाते की, ‘या किल्ल्याने आपली टांग एखाद्या गोष्टीत टाकली तर ते काम कधीच पूर्ण होत नाही.’
चांदवड म्हणजे वडाची व्याप्ती चंद्रापर्यंत गेली आहे ते चांदवड. मात्र आता वडांची संख्या खूप कमी दिसते. चांदवड नगर इ. स. ८ व्या शतकाच्या सुमारास वसले असल्याचा उल्लेख शनि महात्माच्या पोथीत आला आहे. त्यात चांदवडला ताम्रलींदापूर असे म्हणले आहे तर जैन साहित्यात चंद्रादिव्यपुरी म्हणले आहे. यादव घराण्यातील द्रढप्रहार राजाच्या काळात चांदवडला आर्थिक सुबत्ता मिळाली. या काळात चांदवडला चंद्रपूरही म्हणले गेले. तर एका अख्यायिकेनुसार अगस्ती ऋषी चांदवडमध्ये वास्तव्यास असताना त्यांना चांदवडकरांनी तूप दिले नाही म्हणून त्यांनी शाप देत ही नगरी चांडाळनगरी किंवा चांडाळपूर असल्याचे म्हटल्याने पुढे ती चांदवड म्हणून ओळखली जाऊ लागली. काष्टशिल्पांमुळे सजलेल्या चांदवडला चांदोर असेही म्हणले जायचे तर मोगलांच्या काळात चांदवडचा उल्लेख जाफराबाद असा केला गेला आहे.
वडनेर भैरव - हे चांदवड तालुक्यातील एक महत्त्वाचे गाव आहे. वडनेर भैरव या तील वडनेर आणि भैरव असे दोन गावे असल्याचा संदर्भ मिळतो. या गावाला दोन वेशी आहे. दोन मारुतीचे देऊळे. वडांची जास्त झाडे खेडगाव रस्त्याला गावाला लागून असल्याने ते वडनेर व भैरवनाथ मंदिर असलेले भैरव. येथील कालभैरवनाथ या ग्रामदेवतेची चैञ पौर्णिमेला होणारी रथयात्रा महत्त्वपूर्ण आहे. हे गाव पूर्वी नागवेलींच्या पाणमळ्यासाठी प्रसिद्ध होते. आता या गावात मोठ्या प्रमाणात द्राक्षे शेती केली जाते. येथील द्राक्षे चांगली दर्जेदार असल्याने जागतिक बाजारपेठेत चांगली मागणी आहे. नेञावती नदीच्या काठी वसलेल्या या गावाला प्राचीन वारसा लाभलेला आहे. वटक ऋषी नावांच्या ऋषींनी हे नगर वसवल्याचा पुराणामध्ये उल्लेख आहे.
गोविंदगिरी महाराज - ऐन तारुण्यात गृहस्थश्रमाचा त्याग करून संन्यस्थाश्रम स्वीकारणारे गोविंदगिरी एक अवलिया साधू पुरुष होय. पूर्वाश्रमीचे गोविंद भालेराव संन्यस्त झाल्यानंतर गोविंदगिरी या नावाने सिद्धपुरुष म्हणून ख्यातकीर्त झाले. गोविंद भालेरावांची स्वतःची बागायती शेती, नागवेलीच्या बागा आणि बागायतदार व प्रगतीशील अशा वडनेर भैरव सारख्या गावात जन्म घेऊनही संसारविषयी विरक्ती निर्माण झाल्याने महाराजांनी संन्यास घेतला. गोविंदगिरी महाराजांनी संन्यास घेतल्यानंतर गावाच्या वेशीच्या आत पाऊल ठेवायचो नाही अशी प्रतिज्ञा केली असल्याने गोविंदगिरी महाराज पुन्हा गावाकडे भेटीदाखलही आले नाही. त्यांचे काय झाले? ते कुठे आहेत? याची खबर गावाला आणि भालेराव परिवारलाही नव्हती. एकदा वडनेर भैरवचे नाथपदेशी माधवबाबा सलादे चातुर्मासात त्र्यंबकेश्वर येथे गेले असताना त्यांना कुशावर्ताजवळ नागवेलीचे पान खात असणाऱ्या एका अवलिया साधू महाराजांचे दर्शन झाले. नागवेलीच्या पानांचा विडा खाण्याच्या व विसर्जन करण्याच्या खास वडनेरी पद्धतीवरून हे साधू पुरुष वडनेर भैरवचे तर नसावे अशी शंका सलादे बाबांना आली. त्यानंतर त्यांनी ह्या अवलिया पुरुषाच्या राहण्याच्या ठिकाणाचा ठावठिकाणा लावला व चौकशीअंती हेच गोविंदगिरी महाराज तीस पस्तीस वर्षापूर्वी गावातून संन्यस्त झालेले एकेकाळीचे गोविंदराव भालेराव हे निश्चित झाले. या कामी सागरानंद महाराज यांची सलादे बाबांना फार मोठी मदत झाली. गोविंदगिरी महाराजांची गावात माहिती कळल्यानंतर गावकऱ्यांजनी महाराजांना गावात येण्याविषयी आग्रह केला मात्र मी संन्यास घेतला असल्याने गावाच्या वेशीच्या आत पाऊल टाकायचो नाही या आपल्या भूमिकेवर महाराज ठाम होते. संत जिवनेश्वर काळू बाबा आश्रमाचे मठाधिपती ह.भ.प बबनबाबा व सलादे बाबा यांनी गोविंदगिरी बाबांना विनंती केली की आपण आपल्या मातोश्रीचे अंतिम दर्शन तरी करावे. ही विनंती महाराजांनी मान्य केली मात्र मी वेशीच्या आत पाऊल टाकायचो नाही ही अटही सांगितली. त्यामुळे ही भेट गावाबाहेर असणाऱ्याव शिरवाडे वडनेर रोडवरील काळूबाबा आश्रमात घेण्यात आली. यावेळी अनेक गावकरी उपस्थतीत होते. नंतर संतकृपा युवक मंडळाने वडनेर भैरव भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमासाठी करवीर धार्मिक पिठाच्या शंकराचार्यासोबत गोविंदगिरी महाराजही उपस्थित होते. हे वडनेरवासीयांना महाराजांचे झालेले शेवटचे दर्शन होय. यानंतर काही वर्षातच महाराजांचे राज्यस्थांमध्ये अरवली पर्वताच्या कुशीत माऊंट आबू येथे महानिर्वाण झाले. येथेच महाराजांची समाधी बांधण्यात आली आहे. वडनेर भैरव येथील ग्रामसंत जिवनेश्वर काळूबाबा यांच्या परंपरेतील त्यागमूर्ती म्हणून गोविंदगिरी महाराजांचे नाव घ्यावे लागेल. गोविंदगिरी महाराजांचे वडनेर भैरव, जानोरी दिंडोरीसह भारतभर मोठा भक्त परिवार आहे.
कवी प्रा.डॉ.कैलास सलादे हे वडनेर भैरव या गावचेच. त्यांचा 'दाहगाथा' हा शब्दालय प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला मराठीतील महत्त्वाचा काव्यसंग्रह होय. कवी वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते हा संग्रह प्रकाशित करण्यात आला. वर्तमान ग्रामवास्तवाचे सशक्त चिञण त्यात दिसते. मराठीतील अनेक मान्यवर समीक्षकांनी दाहगाथा या संग्रहाचे कौतुक केले आहे.
भौगोलिक स्थान
इतिहास
लोकसंख्या
दळणवळण
उद्योग
कृषी
शिक्षण व आरोग्य
पर्यटन
प्रसिद्ध ठिकाणे
- रेणुका माता मंदिर
- चंद्रेश्वर मंदिर
- राणी अहिल्याबाई होळकर वाडा
- इंद्रायणी किल्ला
तालुक्यातील गावे
बहादुरी भदाणे (चांदवड) भारविर भातगाव (चांदवड) भायळे भोयेगाव भुत्याणे बोपणे बोराळे (चांदवड) चांदवड चिखलांबे चिंचोळे दहेगावमनमाड दहिवड (चांदवड) डाह्याणे दरेगाव (चांदवड) देवगाव (चांदवड) देवेरगाव धोडांबे धोंडगव्हाण धोतरखेडे दिघवड डोणगाव (चांदवड) डोंगरगाव (चांदवड) दुधखेडे दुगाव एकरूखे गंगावे गणुर गोहरण गुऱ्हाळे हरनुळ हरसुळ (चांदवड) हट्टी (चांदवड) हिरापूर (चांदवड) हिवरखेडे इंदिरानगर (चांदवड) इंद्राईवाडी जैतापूर (चांदवड) जांबुटके (चांदवड) जोपुळ (चांदवड) कळमदरे काळखोडे कानडगाव (चांदवड) कानमंडाळे कातरवाडी (चांदवड) काझीसांगवी खडकजांब खडकओझर खेळदरी कोकणखेडे कोळटेक कुंडलगाव कुंदणे माळसणे मंगरूळ (चांदवड) मेसणखेडे बुद्रुक मेसणखेडे खुर्द नांदुरटेक नारायणगाव (चांदवड) नारायणखेडे नवापूर (चांदवड) न्हानवे निंबाळे निमगव्हाण (चांदवड) निमोण पन्हाळे (चांदवड) पारेगाव परसुळ (चांदवड) पाटे (चांदवड) पाथरशेंबे पिंपळगावधाबळी पिंपळनरे पिंपलाड पुरी (चांदवड) राहोड राजदेरवाडी रापळी रायपूर (चांदवड) रेडगाव खुर्द साळसणे शेळु (चांदवड) शेरीसालईबन शिंदे (चांदवड) शिंगवे (चांदवड) शिरसाणे शिरूर (चांदवड) शिवाजीनगर (चांदवड) शिवरे (चांदवड) सोग्रस सोनीसंगवी सुतारखेडे तळेगावरोही तळवडे (चांदवड) तिसगाव (चांदवड) उर्धुळ उसवड वड (चांदवड) वडाळीभोई वडबरे वडगावपांगु वडनेरभाईराव वाहेगावसळ वाकीबुद्रुक वाकीखुर्द वारडी विजयनगर (चांदवड) विटावे वागदरडी
संदर्भ
- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
नाशिक जिल्ह्यातील तालुके |
---|
नाशिक तालुका | इगतपुरी तालुका | दिंडोरी तालुका | पेठ तालुका | त्र्यंबकेश्वर तालुका | कळवण तालुका | देवळा तालुका | सुरगाणा तालुका | सटाणा तालुका | मालेगाव तालुका | नांदगाव तालुका | चांदवड तालुका | निफाड तालुका | सिन्नर तालुका | येवला तालुका |