Jump to content

चांदवड

हा लेख चांदवड शहराविषयी आहे. चांदवड तालुक्याच्या माहितीसाठी पहा, चांदवड तालुका
  ?चांदवड

महाराष्ट्र् • भारत
—  शहर, तालुका  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ७३० मी
हवामान
वर्षाव

• ६३२ मिमी (२४.९ इंच)
अंतर
मुंबई पासून
नाशिक पासून

• २३० किमी (एनएच-३)
• ६५ किमी (एनएच-३)
जवळचे शहरमनमाड, मालेगाव
लोकसंख्या
लिंग गुणोत्तर
साक्षरता
• पुरूष
• स्त्री
२५,३४१ (२०११)
१.१ /
८८.१२ %
• ९१.८८ %
• ८४.०० %
भाषामराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• ४२३१०१
• +०२५५६
• एमएच्-१५

चांदवड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातले छोटे शहर आहे. चांदवड तालुक्याचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या गावाची लोकसंख्या सुमारे २०,००० आहे[ संदर्भ हवा ]. सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३वर पिंपळगाव (बसवंत) व मालेगाव या गावांमधोमध पडते. येथून पूर्वेस मनमाड व नांदगाव शहरे व दक्षिणेस निफाड शहर असून पश्चिमेस व उत्तरेस अनुक्रमे दिंडोरी व देवळा आहे. हा तालुका जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात आहे.

चांदवड म्हणजे वडाची व्याप्ती चंद्रापर्यंत गेली आहे ते चांदवड. मात्र आता वडांची संख्या खूप कमी दिसते. चांदवड नगर इ.स. ८ व्या शतकाच्या सुमारास वसले असल्याचा उल्लेख शनि माहात्म्याच्या पोथीत आला आहे. त्यात चांदवडला ताम्रलिंदापूर असे म्हणले आहे तर जैन साहित्यात चंद्रदिव्यपुरी म्हणले आहे. यादव घराण्यातील दृढप्रहार राजाच्या काळात चांदवडला आर्थिक सुबत्ता मिळाली. या काळात चांदवडला चंद्रपूरही म्हणले गेले. तर एका आख्यायिकेनुसार अगस्ती ऋषी चांदवडमध्ये वास्तव्यास असताना त्यांना चांदवडकरांनी तूप दिले नाही म्हणून त्यांनी शाप देत ही नगरी चांडाळनगरी किंवा चांडाळपूर असल्याचे म्हटल्याने पुढे ती चांदवड म्हणून ओळखली जाऊ लागली. काष्टशिल्पांमुळे सजलेल्या चांदवडला चांदोर असेही म्हणले जायचे तर मोगलांच्या काळात चांदवडचा उल्लेख जाफराबाद असा केला गेला आहे.

वैशिष्ट्ये

चंद्रेश्वर (महादेव मंदिर) मंदिराजवळून

येथे रेणुका देवीचे पुरातन मंदिर आणि अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला रंगमहाल किल्ला आहे.

हवामान

येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते.

महत्त्वाची स्थळे

* रेणुका देवीचे मंदिर : नवरात्रात आणि चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा भरते. * चंद्रेश्वर (महादेव मंदिर * रंगमहाल(होळक‍र वाडा) * गणेश मंदीर (वडबारे) * शनि मंदिर * इंद्रायणी किल्ला