Jump to content

चषक (तारकासमूह)

चषक
तारकासमूह
चषक मधील ताऱ्यांची नावे
लघुरुप Crt
प्रतीक चषक
विषुवांश ११
क्रांती −१६
चतुर्थांश SQ2
क्षेत्रफळ २८२ चौ. अंश. (५३वा)
मुख्य तारे
बायर/फ्लॅमस्टीड
तारे
१२
ग्रह असणारे तारे
३.००m पेक्षा तेजस्वी तारे
१०.०० pc (३२.६२ ly) च्या आतील तारे
सर्वात तेजस्वी तारा δ Crt (Labrum) (३.५७
m)
सर्वात जवळील तारा LHS 2358
(३४.८६ ly, १०.६९ pc)
मेसिए वस्तू
उल्का वर्षाव ईटा क्रेटेरिस
शेजारील
तारकासमूह
सिंह
कन्या
हस्त
वासुकी
षडंश
+६५° आणि −९०° या अक्षांशामध्ये दिसतो.
एप्रिल महिन्यात रात्री ९:०० वाजता सर्वोत्तम दिसतो.

चषक हा दक्षिण खगोलातील एक तारकासमूह आहे. त्याचे इंग्रजी नाव Crater (क्रेटर) आहे ज्याचा लॅटिन भाषेमध्ये "चषक" असा अर्थ होतो. दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमीने बनवलेल्या ४८ तारकासमूहांच्या यादीमध्ये याचा समावेश होता.

या तारकासमूहामध्ये डेल्टा क्रेटेरिस या तिसऱ्या दृश्यप्रतीपेक्षा जास्त तेजस्वी एकही तारा नाही.

गुणधर्म

२८२.४ चौ.वर्ग क्षेत्रफळ (आकाशाचा ०.६८५%) व्यापणारा चषक तारकासमूह आकारमानाने ५३वा तारकासमूह आहे. त्याच्या उत्तरेला सिंह आणि कन्या, पूर्वेला हस्त, दक्षिण आणि पश्चिमेला वासुकी, आणि नैऋत्येला षडंश हे तारकासमूह आहेत. विषुववृत्तीय निर्देशांक प्रणालीमध्ये याचा विषुवांश १०h ५१m १४s ते ११ता ५६मि २४से, आणि क्रांति −६.६६° ते −२५.२०° यादरम्यान आहे.[]

वैशिष्ट्ये

नुसत्या डोळ्यांनी दिसणारे चषक तारकासमूहातील तारे

तारे

चषक तारकासमूहामध्ये ६.५ किंवा त्यापेक्षा जास्त तीव्र आभासी दृश्यप्रतीचे ३३ तारे आहेत.[][]

अल्केस या पारंपारिक नावाने ओळखला जाणारा अल्फा क्रेटेरिस तारा नारंगी रंगाचा ४.१ दृश्यप्रतीचा तारा आहे. त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर १५९ प्रकाश-वर्ष आहे.[] त्याच्या पारंपारिक नावाचा अर्थ "चषक" आहे. बीटा क्रेटेरिस पृथ्वीपासून २६६ प्रकाश-वर्ष अंतरावरील ४.५ दृश्यप्रतीचा निळा तारा आहे. गॅमा क्रेटेरिस एक द्वैती तारा आहे. मुख्य तारा ८४ प्रकाश-वर्ष अंतरावरील ४.१ दृश्यप्रतीचा श्वेत बटू तारा आहे. दुसऱ्या ताऱ्याची दृश्यप्रत ९.६ आहे. डेल्टा क्रेटेरिस हा ३.६ दृश्यप्रतीचा तारा या तारकासमूहातील सर्वात तेजस्वी तारा आहे. तो नारंगी रंगाचा असून पृथ्वीपासून १८६ प्रकाश-वर्ष अंतरावर आहे.

दूर अंतराळातील वस्तू

एनजीसी ३५११ ही SBbc प्रकारची १२ दृश्यप्रतीची सर्पिलाकार दीर्घिका आहे. ती अबेल १०६० या दीर्घिकांच्या गुच्छाचा भाग आहे.

एनजीसी ३८८७ ही SBc प्रकारची भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिका आहे. तीची दृश्यप्रत ११ आहे.

एनजीसी ३९८१ ही दोन विस्तारलेले सर्पिलाकार फाटे असलेली SBbc प्रकारची सर्पिलाकार दीर्घिका आहे. तिची दृश्यप्रत १२ आहे.

आरएक्स जे११३१ पृथ्वीपासून ६ अब्ज प्रकाशवर्षे अंतरावरील क्वेसार आहे. या क्वेसारच्या केंद्रातील कृष्णविवर असे पहिले कृष्णविवर होते ज्याची फिरकी थेटपणे मोजण्यात आली होती.[]

संदर्भ

  1. ^ "Crater, Constellation Boundary". 2 December 2016 रोजी पाहिले. Cite journal requires |journal= (सहाय्य)
  2. ^ Bortle John E. "The Bortle Dark-Sky Scale". Sky & Telescope. 2014-03-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 June 2015 रोजी पाहिले.
  3. ^ Ian Ridpath. "Constellations: Andromeda–Indus". Star Tales. 2 December 2016 रोजी पाहिले.
  4. ^ van Leeuwen, F. (2007). "Validation of the New Hipparcos Reduction". Astronomy and Astrophysics. 474 (2): 653–64. arXiv:0708.1752. Bibcode:2007A&A...474..653V. doi:10.1051/0004-6361:20078357.
  5. ^ Nola Taylor Redd. "Monster Black Hole Spins at Half the Speed of Light". March 5, 2014 रोजी पाहिले.