Jump to content

चव

स्वाद हा लेख येथे पुनर्निर्देशत होतो. भौतिकशास्त्रातील संकल्पने साठी स्वाद (भौतिकशास्त्र) हा लेख पहा. चव ही जीभ या ज्ञानेंद्रियाची संवेदना आहे. विविध चवींची जाणीव जीभेच्या विविध भागांवर होते. चवीची जाणीव ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. रुचिकलिका जिभेवर असतात. वेगवेगळ्या रुचिकलिका वेगवेगळ्या प्रकारची चव आपल्या मेंदूपर्यंत पोचवतात. मानवाच्या जिभेवर सुमारे तीन हजार रुचिकलिका असतात. धूम्रपान केल्याने स्वाद ग्रंथींची कार्यप्रणाली खराब होते. माशी, फुलपाखरू पायांवर रुचिकलिका असतात.

षड्रस/षडरस

चव, ज्याला आयुर्वेदात रस असे म्हणतात ते मुख्य सहा रस आहेत आणि यांनाच षडरस असे म्हणतात. आयुवेदतील हे षडरस पुढील प्रमाणे आहेत

गोड, आंबट, कडू, तिखट, तुरट आणि खारट

इतिहास

आदिमानवाकडे आत्मसंरक्षणार्थ जी हत्यारे होती तत्यांत जिभेचा समावेश होईल कारण त्या काळात मानव पदार्थ खाण्यायोग्य आहे की नाही, हे त्या पदाथांची चव घेऊन ठरवत असे.

हे सुद्धा पहा