चलचित्रदिग्दर्शक
सिनेमॅटोग्राफर किंवा चलचित्रदिग्दर्शक (ज्यांना DP किंवा DOP नावानेही संबोधले जाते) एखाद्या चित्रपटाच्या, दूरचित्रवाणीवरील दृश्यमाध्यम गोष्टींच्या किंवा इतर लाईव्ह ॲक्शन भागाच्या कॅमेरा आणि प्रकाशयोजनेचे काम करणाऱ्या समुहाचा मुख्य असतो आणि या गोष्टींच्या चलचित्रांतील तांत्रिक निर्णय आणि कलात्मक बाजूचा सांभाळ करण्यासाठी जबाबदार असतो. या क्षेत्रातील अभ्यास आणि प्रत्यक्ष कृतीला सिनेमॅटोग्राफी म्हणून ओळखले जाते. आज
दिग्दर्शकांसंबंधी पुस्तके
- अनंत आठवणी (अनंत माने यांचे आत्मचरित्र)
- अलबेला मास्टर भगवान (लेखक : इसाक मुजावर)
- एक झाड दोन पक्षी (पटकथाकार-दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांचे आत्मचरित्र)
- एका सोंगाड्याची बतावणी (दादा कोंडके यांचे चरित्र. लेखक इसाक मुजावर)
- गंगा आए कहॉं से : दिग्दर्शक गुलजार यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे पुस्तक (लेखक विजय पाडळकर)
- गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका (लेखक अरुण खोपकर)
- दादासाहेब फाळके यांचे चरित्र (लेखक इसाक मुजावर)
- भारतीय सिनेमाचे जनक फाळके (लेखक : बापू वाटवे)
- मौनांकित (गंगाधर महांबरे याणी लिहिलेले दादासाहेब फाळके यांचे चरित्र)
- शब्दरुपेरी : प्रसिद्ध वित्रपट दिग्दर्शकांसोबतच्या आठवणी. (लेखक प्रा, प्रवीण दवणे)
- शांतारामा : चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांचे आत्मचरित्र.