Jump to content

चरणजीत सिंग अटवाल

चरणजीत सिंग अटवाल(जन्म:मार्च १५,इ.स. १९३७) हे भारतीय राजकारणी आहेत. ते इ.स. १९८५ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिरोमणी अकाली दल पक्षाचे उमेदवार म्हणून पंजाब राज्यातील फिल्लोर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.त्याचप्रमाणे ते मार्च इ.स. १९९७ ते मार्च इ.स. २००२ या काळात पंजाब विधानसभेचे अध्यक्ष आणि जून इ.स. २००४ ते मे इ.स. २००९ या काळात लोकसभेचे उपाध्यक्ष होते.