Jump to content

चमच्या (पक्षी)

चमच्या
शास्त्रीय नाव Platalea leucorodia
कुळ अवाकाद्य
(Threskiornithidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Eurasian Spoonbill
संस्कृत दर्विदा, खजाक
हिंदी चमचा, दाबिल
Platalea leucorodia

चमच्या किंवा चमचा हा साधारणपणे ६० सें. मी. आकारमानाचा, बदकापेक्षा मोठा, लांब मानेचा, शुभ्र पांढरा पक्षी असून याचे पाय काळ्या रंगाचे असतात. याची चोच काळ्या रंगाची टोकाशी पिवळी आणि टोकाशी चमच्याचा आकार असतो. वीण काळात नराला शेंडी येते आणि गळ्याखालील भाग पिवळा होतो. एरवी नर-मादी दिसायला सारखेच असतात. हे पक्षी एकट्याने किंवा थव्याने राहतात. दलदल, तलाव, चिखलाचा भाग, नद्या वगैरे पाणथळ ठिकाणी बेडूक, कीटक, पाण वनस्पती, मासोळ्या, खेकडे, गोगलगाय वगैरे खातांना हा हमखास दिसतो. याच्या लांब चोचीने हा पाणी ढवळून काढतो मग सैरावैरा पळणारे जलचर याला सहज पकडता येतात.

भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार या देशांमध्ये चमच्याची वस्ती आहे.

जुलै ते नोव्हेंबर हा चमच्याचा वीण काळ असून हा आपले घरटे पाण्याजवळील उंच झाडावर बांधतो. मादी एकावेळी शुभ्र पांढऱ्या रंगाची त्यावर तपकिरी ठिपके असलेली अंडी देते.

चित्रदालन

बाह्य दुवे