Jump to content

चतुर्दश विद्या

      वैदिक काळापसून गुरुशिष्य परंपरेमध्ये  चौदा विद्यांचे शिक्षण गुरुगृही मिळत असे. यात ४वेद, ६वेदांगे, पुराणे, धर्मशास्त्र, न्यायशास्त्र आणि मीमांसाशास्त्र यांचा समावेश होता.

         अङानि वेदाश्चत्वारो मीमांसा न्यायविस्तरः।

          धर्मशास्त्रं पुराणानि विद्याश्चैताश्चतुर्दश ।।

    चार वेद -

  १.ऋग्वेद  :   ऋक् म्हणजे देवतांची स्तुती वाचक मन्त्र होय. काही ऋचांचे मिळून सूक्ते होतात. यात एकूण १०२८ सूक्ते आहेत. शाकल,  बाष्कल, आश्वलायन, माण्डूकायन, शांखायन अशा ५ शाखा आहेत.

२. यजुर्वेद :

या वेदातील मन्त्रांना यजुस् म्हणतात. यजुर्मन्त्र यागानुक्रमानुसार एकत्र केलेले आहेत. यजुर्वेदाचे कृष्णयजुर्वेद व शुक्लयजुर्वेद हे दोन भेद आहेत.

३.सामवेद :

सामवेदाद्वारे ऋचांचे छंदोबद्ध गायन केले जाते. जैमिनीय, कौथुम आणि राणायनीय या सामवेदाच्या शाखा आहेत.

४.अथर्ववेद :

सर्वसामान्य मानवाच्या लौकिक स्थैर्यासाठी अथर्ववेदातील मन्त्रे आहेत. या वेदाच्या शौनक आणि पैप्पलाद ह्या दोन शाखा आहेत.

      सहा वेदांगे  -[]

    छ्न्दः पादौ तु वेदस्य हस्तौ कल्पोsथ पठ्यते

ज्योतिशामयनं चक्षुर्निरुक्तं श्रोत्रमुच्यते ।

शिक्षा घ्राणं तु वेदस्य मुखं व्याकरणं स्मृतम्

तस्मात् साङ्म्धीत्यैव ब्रह्म्लोके महीयते  ।।

१. शिक्षा :

वेदांचे उच्चारण शास्त्र म्हणजे शिक्षा होय.

२.कल्पसूत्रे :

यज्ञातील शारीरिक क्रिया आणि समाजातील आदर्श वर्तन यांचा ऊहापोह यात आढळ्तो.

३.निरुक्त  :

वैदिक मन्त्रांचा अर्थ समजण्यासाठी निरुक्ताचा उपयोग होतो.

४.व्याकरण  :

वैदिक मन्त्रांचा अर्थ समजण्यासाठी निरुक्ताबरोबरच व्याकरणाचाही आधार घ्यावा लागतो.

५.छंन्दःशास्त्र  :

यात वैदिक मन्त्रांच्या विशिष्ट चालींचे म्हणजे छन्दांचे ज्ञान मिळते.

६.ज्योतिष शास्त्र :

यज्ञ करण्यासाठी योग्य वेळ, ऋतू निश्चित करण्याकरीता हे शास्त्र महत्त्वाचे आहे.   

 मीमांसा -

मीमांसा दोन प्रकारची आहे.

१. जैमिनीऋषींचि पूर्व मीमांसा.

२. बादरायण व्यासांची उत्तर मीमांसा.

न्यायशास्त्र  -

गौतम ऋषी प्रणीत हे शास्त्र काटेकोर प्रमाणासाठी प्रसिद्ध आहे.

धर्मशास्त्र  -

रामायण, महाभारत, या बरोबरच मनु, वसिष्ठ इत्यादी मुनींद्वारे हे धर्मशास्त्र प्रणीत आहे.

पुराणे  -

ब्रह्म, पद्म, विष्णू, गरूड, मार्कण्डेय, ब्रह्मवैवर्त, लिंग, भागवत, नारद, कूर्म, स्कंद, वराह, अग्नि, भविष्य, वायू, ब्रह्माण्ड, वामन, मत्स्य, ही १८ पुराणे होय.

      अश्या प्रकारे ह्या १४ विद्या होय.

  1. ^ प्रस्थानभेदाः.