Jump to content

चटाळे

चटाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातले गाव आहे.


  ?चटाळे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ४ मी
जिल्हापालघर
सरपंच
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• ४०१४०२
• +०२५२५
• महा ४८

भौगोलिक स्थान

सफाळे रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला जाणाऱ्या माकुणसार आगरवाडी रस्तेमार्गावर १० किमी अंतरावर हे वसलेले आहे. येथील हवामान उन्हाळ्यात उष्ण, हिवाळ्यात शीतल थंड, तर पावसाळ्यात उष्ण असते. पावसाळ्यात येथे ४ महिने मुसळधार पाऊस पडतो.

शेकाट्या/शेकोट्या/शेकाटया हा स्थलांतरित पक्षी पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यात माकुणसार, केळवे, माहीम, खारेकुरण,चटाळे येथील मिठागरात हल्ली दिसू लागला आहे.[]

लोकजीवन

येथे मुख्यतः वाडवळ, बौद्ध, समाजातील लोक पिढ्यानपिढ्या राहतात. खरीप हंगामातील भातशेती बरोबरच रब्बी हंगामात येथे फुलभाज्या, फळभाज्या, पालेभाज्या ह्यांचे पीक घेतले जाते. मुख्यतः दुधी भोपळा, कारले, कोबी, घोसाळे, लाल भोपळा, पडवळ, इत्यादी भाज्यांचे उत्पादन घेतात.

नागरी सुविधा

सार्वजनिक रस्ते, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, इत्यादी नागरी सोयीसुविधा ग्रामपंचायतीमार्फत पुरविल्या जातात.सफाळे रेल्वे स्थानकातून येथे येण्यासाठी नियमित एसटी बस आहे. सफाळे रेल्वे स्थानकावरून दातिवरे, भादवे, मथाणे, एडवण, कोरे गावाकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस येथे थांबतात. सफाळे रेल्वे स्थानकातून येथे येण्यासाठी सार्वजनिक तसेच खाजगी ऑटोरिक्षासुद्धा मिळतात. गावात प्राथमिक शाळेची सोय आहे. माध्यमिक शिक्षणासाठी आगरवाडी अथवा एडवण गावात जावे लागते.

प्रसिद्ध व्यक्ती

श्री.वासुदेवराव वर्तक []

संदर्भ

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc

  1. ^ #महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, मंगळवार दिनांक १ आगस्ट २०२३
  2. ^ #महाराष्ट्र टाईम्स मुंबई टाईम्स वसई विरार पुरवणी शनिवार दिनांक २८ जानेवारी २०२३