चटपटीत बटाटे
- एक किलो बटाटे (कमी पाण्यात उकडावेत. सालं काढून त्याचे मोठे चौकोनी तुकडे करावेत)
- एक ते दीड कप साधारणं आंबट दही
- अर्धा कप भाजलेले तीळ
- एक टीस्पून तेल
- चवीनुसार मीठ.
कृती
भाजलेले तीळ आणि मिरच्यांचं वाटण करून घ्यावं. या वाटणात दही घालावं. हे मिश्रण एकजीव करून बाजूला ठेवावं. मध्यम आचेवर एक नॉन-स्टिक पॅन मध्ये अर्धा चमचा तेल घालाव. त्यात हे वाटण घालावं. थोडावेळ परतल्यावर त्यात मीठ घालावं. आता त्यात बटाटे घालावेत. बटाट्यांना वाटण नीट लागेपर्यंत परतावं. पाणी निघून जाईपर्यंत परतावं.
संदर्भ
http://www.marathiworld.com/ann-he-purnabramha-m/chatpatitbatate