चट, तड, आणि फट
धक्का, म्हणजेच हिसक्याचे कालसापेक्ष भैदिज, "चट" म्हणूनही ओळखले जाते.
धक्क्याचे कालसापेक्ष भैदिज म्हणजे तड, आणि कालसापेक्ष दुसरे भैदिज म्हणजे फट होय. तथापि चट, तड, फट ही नावे वैश्विक किंवा सर्वसामान्यपणे वापरली जात नाही. मुळातच उपयोजित भौतिकीत स्थानाची पहिली तीन कालसापेक्ष भैदिजे (वेग, त्वरण, हिसका) वारंवार येतात, पण त्यापुढची भैदिजे सहजा आढळत नाहीत. त्यामुळेच सर्वमान्य अशी संज्ञा नाही.
तड आणि फटना वस्तुमानाने गुणल्यास अनुक्रमे हादरा आणि दणका ही बलाचे कालसापेक्ष तिसरी आणि चौथी भैदिजे मिळतात.