चंपाषष्ठी
चंपाषष्ठी किंवा स्कंद षष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते.[१] मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात.[२]
स्वरूप
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो.[३]
नवरात्री पूजा
कुलाचाराप्रमाणे ज्यांच्या पूजेत सुघट व टाक असतात ते त्यांची पूजा करतात. नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात.[४] जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या अन्य देवळांतही |खंडोबाचा उत्सव असतो. घटाची स्थापना,नंदादीप,मल्हारी महात्म्य वाचणे व त्याचा पाठ करणे, एकाच वेळी जेवणे(एकभुक्त),शिवलिंगाचे दर्शन घेणे,ब्राह्मण-सुवासिनी तसेच वाघ्या आणी मुरळी यांना भोजन देणे असे शा दिवस केले जाते. चंपाषष्ठी या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवितात. तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात.खंडोबाची तळी भरून आरती करतात.
अन्य
मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाचा दिवस म्हणजे देवदीपावली किंवा छोटी दिवाळी.[५] मुख्यत: चित्तपावनांमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांना भजण्याचा तो दिवस. चित्तपावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्यांची संख्या वेगळी असते. गावातील मुख्य देवता, इतर उपदेव-देवता महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात. त्याचबरोबर काही कुटुंबांत पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात. त्यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या सतरा, चोवीस, नऊ अशी कोणतीही असते.
या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्घ्य देण्याची पद्धती आहे.[२]
हे सुद्धा पहा
बाह्यदुवे
संदर्भ
- ^ "आज चंपाषष्ठी!". दैनिक लोकसत्ता. २७ नोव्हेंबर २०१४. ३१ ऑगस्ट २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ डिसेंबर २०१९ रोजी पाहिले.
- ^ a b जोशी, महादेवशास्त्री (२०००). भारतीय संस्कृती कोश खंड तिसरा. पुणे: भारतीय संस्कृती कोश मंडळ प्रकाशन. pp. ३०४-३०५.
- ^ "https://www.esakal.com/pune/jejuri-news-champashasti-utsav-83941". e sakal. २४.११.२०१७. १६.१२.२०१९ रोजी पाहिले.
|access-date=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in|title=
(सहाय्य) - ^ "चंपाषष्ठी". मराठी विश्कोश. १६.१२.२०१९ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "देव दीपावली (देवदिवाळी)". https://www.thinkmaharashtra.com. 2019-12-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १६.१२.२०१९ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in|संकेतस्थळ=
(सहाय्य)