चंपकलाल पुराणी
चंपकलाल पुराणी - (जन्म ०२ फेब्रुवारी १९०३, पाटण, गुजरात - मृत्यू ०९ मे १९९२) हे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी (मीरा अल्फासा) यांचे वैयक्तिक साहाय्यक म्हणून कार्यरत होते. ते चित्रकार, लेखक आणि कवी होते.
जीवन
१९२१ साली चंपकलाल प्रथम पॉण्डिचेरी येथे आले. श्रीअरविंद यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीतच त्यांना त्यांच्या जीवितकार्याची जाणीव झाली. १९२३ साली श्रीअरविंद यांच्या सांगण्यावरून ते पॉण्डिचेरी येथे कायमचे वास्तव्यास आले.
१९३८ ते १९५० या काळात चंपकलाल आणि निरोदबरन हे श्रीअरविंद यांचे साहाय्यक म्हणून कार्यरत होते. पुढे १९७३ पर्यंत ते श्रीमाताजी यांचे सहाय्यक म्हणून कार्यरत होते.[१]
त्यांनी भारतभरात अनेक ठिकाणी आणि आशिया, युरोपातील अनेक देश व अमेरिका येथे श्रीअरविंद व श्रीमाताजी यांचे कार्य पोहोचविले. [२][३]
मार्बलिंग टेकनिक या तंत्राचा उपयोग करून त्यांनी ७०० चित्रे काढली होती. [४]
ग्रंथसंपदा
- चंपकलाल स्पिक्स, संपादक - एम.पी.पंडित, प्रथम आवृत्ती १९७५
- चंपकलालना संस्मरण (चंपकलाल स्पिक्सचा गुजराती अनुवाद)
- चंपकलाल की वाणी (चंपकलाल स्पिक्सचा हिंदी अनुवाद)
- चंपकलाल - द आर्टिस्ट अँड अ योगी
- चंपकलाल ट्रेझर्स
- द व्हिजन्स ऑफ चंपकलाल, १९९०
- प्रेअर्स अँड ॲस्पिरेशन्स (मूळ गुजराती), अनुवाद सुधा आणि डॉन फिशर[२]
- चंपकलालस् करस्पॉन्डन्स विथ द मदर
संदर्भ
- ^ Champaklal Purani (2002). Roshan (ed.). Champaklal Speaks (3rd ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. ISBN 81-7058-668-2.
- ^ a b Champaklal Purani (1992). Prarthana ane Udgaro [Prayers and Aspirations] (Gujarati भाषेत). Sudha and Don Fisher द्वारे भाषांतरित. Pondichcrry: Sri Aurobindo Society. Pondicherry. ISBN 81-7060-061-8.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ AZ (2020-08-17). "Champaklal". AuroMaa (इंग्रजी भाषेत). 2024-02-02 रोजी पाहिले.
- ^ "Two Lotuses". web.archive.org. 2005-03-12. रोजी मूळ पानापासून संग्रहित2005-03-12. 2024-02-02 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)