चंद्रपूर
?चंद्रपूर महाराष्ट्र • भारत | |
टोपणनाव: चांदा | |
— शहर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | चंद्रपूर |
तालुका/के | नागभिड, राजुरा, जिवती, कोरपना, भद्रावती, सावली, पोंभुर्णा, ब्रम्हपुरी, वरोरा, मुल, चिमूर, बल्लारपूर, सिंदेवाही, चंद्रपूर |
लोकसंख्या | ३,७३,००० (२०११) |
पालकमंत्री | विजय वडेट्टीवार |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • ४४२४०१ • +९१७१७२ • MH 34 |
चंद्रपूर (आधीचे रूढ नाव चांदा) हे चंद्रपूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरात शंकराचे (अंचलेश्वर) व महाकालीची प्राचीन मंदीरे आहेत. चंद्रपूरपट्टा खनिजसंपत्तीत समृद्ध आहे. इ.स.२०११ च्या जनगणनेनुसार चंद्रपूरची लोकसंख्या ३,७३,००० इतकी होती आहे. या गावापासून जवळच सुमारे ५ कि.मी. अंतरावर दुर्गापूर येथे औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प आहे.
गोंड राजा खांडक्या बल्लाळशाह ह्याने १३ व्या शतकात चंद्रपूर शहराची स्थापना केली. चंद्रपूर हे त्यावेळेस ह्या गोंड राज्याची राजधानी होती. यास पूर्वी चांदागढ म्हणून नाव होते. त्याला चांदाही म्हणत असत.११ जानेवारी १९६४ रोजी महाराष्ट्र शासन निर्णय क्र. एन.एम.सी./१०६३ हा निर्गमित करण्यात आला होता. त्यानुसार याचे नाव चांदावरून चंद्रपूर असे करण्यात आले.[१]
औद्योगिक नगरी
चंद्रपूर आणि आसपासच्या परिसरात उच्च दर्जाचा दगडी कोळसा मुबलक प्रमाणात आहे. म्हणून संपूर्ण भारतात चंद्रपूर Black Gold City (मराठी: काळ्या सोन्याचे शहर) ह्या नावाने ओळखले जाते.
चंद्रपूर शहरालगत सिमेंटचे बरेच कारखाने आहेत. उदाहरणार्थ Larsen and Toubro Limited (L&T) , माणिकगढ सिमेंट, Ultra Tech. येथे महाकाली अर्थात कालीमातेचे एक प्रसिद्ध देऊळ आहे .
इतिहास
इ.स.१९५६ पूर्वी हा जिल्हा मध्यप्रांत व बेरार राज्यात होता.
रामाळा तलाव
शहराच्या मध्यभागी हा मालगुजरी तलाव आहे.
दुसरी दीक्षाभूमि
१९५६ मध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी केलेला ‘दीक्षा’ सोहळा बौद्ध धर्माच्या ऐतिहासिक स्वरूपाचा शहरात १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या कुटुंबातील सदस्यांसह बौद्ध धर्म स्वीकारला. त्यानंतर लवकरच बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील कित्येक भागांतून आलेल्या लाखो अनुयायांचे बौद्ध धर्मात रूपांतर केले. १६ ऑक्टोंबर १९५६ रोजी डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी चंद्रपूर येथे अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. त्यानंतर या जागेला “दीक्षाभूमी” म्हणून ओळखले जाते. दीक्षा म्हणजे अक्षरशः धर्म स्वीकारणे आणि भूमी म्हणजे जमीन. हे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे जन्मस्थान आहे. आंबेडकरांनी केवळ धर्मपूर (बौद्ध धर्म स्वीकार) साठी नागपूर व चंद्रपूरची निवड केली आणि म्हणूनच चंद्रपूरला ऐतिहासिक महत्त्व आहे. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ”दीक्षाभूमीच्या आवारात. बुद्धगया पासून बौद्धवृक्षाची एक शाखा आवारात लावली आहे आणि कृपेने वाढत आहे. या पवित्र ठिकाणी दरवर्षी १६ ऑक्टोबरला “धम्म चक्र प्रवर्तन दिन”चे दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित केले जातात. समारंभात हजारो यात्रेकरू आणि भिक्षू दीक्षाभूमीला भेट देतात. दीक्षाभूमी रेल्वे स्थानक व बसस्थानकापासून अवघ्या १ किमी अंतरावर आहे. वाहन रिक्षा सहज उपलब्ध आहे.
भूगोल
दरवाजे
- अंचलेश्वर गेट
- जठपूरा गेट
- पठाणपुरा गेट
- बिनबा गेट
खिडक्या
- चोर खिडकी
- बगड खिडकी
- हनुमान खिडकी
- विठ्ठल खिडकी
- मसन खिडकी
पेठा
- भानापेठ
- बाबूपेठ
- लालपेठ
उपनगरे
- तुकुम
- बापटनगर
- उर्जानगर
- शास्त्री नगर
- रामनगर
- सरकार नगर
- रयतवारी
- बंगाली कॅम्प
वॉर्ड
- एकोरी
- अष्टभुजा
- एकवीरा
- बालाजी
- गंज
- घुटकाळा
कॉलनी
- सिस्टर
- रामबाग वनवसाहत
हवामान
तापमान किमान ७.१ ते कमाल ४७.२ से.च्या दरम्यान असते. पर्जन्यमान १३९८ मि.मी इतके आहे. जिल्ह्याचे हवामान एकंदरीत उष्ण असून मुख्यत: दोन ऋतू आहेत उन्हाळा व हिवाळा. उन्हाळा मोठा व कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो.
जैवविविधता
औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रे
- उर्जानगर (CSTPS) - ३४५० मेगावॅट
- बल्लारपूर - १००० MW विद्युत निर्मिती क्षमता
- दुर्गापूर- ८४० मेगावॅट विद्युत निर्मिती करण्याची क्षमता
प्रशासन
नागरी प्रशासन
- महानगरपालिका
- नगरपालिका
- नगरपंचायत
जिल्हा प्रशासन
- जिल्हाधिकारी
- पोलीस अधीक्षक
- जिल्हा शल्यचिकित्सक
- मुख्य वनसंरक्षक
- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
- जिल्हा माहिती अधिकारी
- जिल्हा आरोग्य अधिकारी
ग्रामीण
- जिल्हा परिषद
- पंचायत समिती
- ग्राम पंचायत
वाहतूक व्यवस्था
- एकल मार्ग वाहतूक : जठपुरा गेट ते गांधी चौक
लोकजीवन
गोंडी परंपरा
संस्कृती
रंगभूमी
चित्रपट
खवय्येगिरी
राजकारण
- मारोतराव कन्नमवार
- शोभा फडणवीस
- शांताराम पोटदुखे
- हंसराज अहिर
- सुधीर मुनगंटीवार
- विजय वडेट्टीवार
प्रसारमाध्यमे
वृत्तपत्रे
- दै. महा विदर्भ
वृत्त वाहिन्या
- सिटी केबल
शिक्षण
चंद्रपूर शहर आपल्या शैक्षणिक सोयी-सुविधांसाठी प्रसिद्ध आहे.
चंद्रपूरात तीन मुख्य पारंपारिक पदवी महाविद्यालये आहेत.
व्यावसायिक महाविद्यालये
चंद्रपूर शहरात नवीनच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) सुरू झाले आहे.
अभियांत्रिकी
शहरातील बाबुपेठ परिसरात सुप्रसिद्ध असे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (GEC) आहे. येथील विद्यार्थ्यांना कॉलेजमधूनच नौकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत, बऱ्याच साॅफ्टवेअर कंपन्या ह्या कॉलेजमध्ये 'कॅम्पस भरती' (Campus Recruitment) साठी येत असतात. त्याचप्रमाणे राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय (RCERT) हे चंद्रपूरातील दुसरे प्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालय विनाअनुदानीत तत्त्वावर चालवले जाते.
औषधनिर्माण
- बजाज औषधनिर्माण (पदविका) पॉलिटेक्निक
- हाय-टेक महाविद्यालय
विधी महाविद्यालय
- शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण
- कर्मवीर दादासाहेब कन्नमवार उच्च माध्यमिक व कनिष्ट महाविद्यालय ( ज्युबिली हायस्कूल ),
- लोकमान्य टिळक विद्यालय (LTV),
केंद्रीय विद्यालय, विद्या विहार महाविद्यालय, विद्या निकेतन उच्च माध्यमिक व कनिष्ट महाविद्यालय, भवानजी भाई चव्हाण हायस्कूल व कनिष्ट महाविद्यालय, माऊंट कार्मेल महाविद्यालय, जनता महाविद्यालय, महर्षी विद्या मंदिर, लोकमान्य टिळक कन्या विद्यालय (LTKV)
खेळ
- गिर्यारोहण
- राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन (२०२३)
पर्यटन स्थळे
चंद्रपूर शहरात व शहराच्या आसपास खालील पर्यटन स्थळे सुप्रसिद्ध आहेत:
महाकाली मंदिर: चंद्रपूर येथील हे महाकालीचे मंदिर राज्यात प्रसिद्ध आहे. चंद्रपूर शहराच्या बस स्थानकापासून पूर्वेस ७ किमी वर हे मंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी ऑटो रिक्षा मुबलक प्रमाणात मिळतात. येथे दरवर्षी हिवाळ्यात चैत्र पौर्णिमेला भरणारी महाकालीची यात्रा अतिशय प्रसिद्ध आहे.
ताडोबा: हा भारतातील सुप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. चंद्रपूरपासून अवघ्या ४० किमी अंतरावर असलेले ताडोबा एक मोठे पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्यात येथे भरपूर विदेशी पर्यटक येत असतात.
आनंदवन:
दीक्षाभूमी, चंद्रपूर:- हे एक प्रसिद्ध बौद्ध तीर्थस्थळ आहे. येथे १६ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ लाख अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यांनी याआधीच्या दोन दिवशी म्हणजेच १४ व १५ ऑक्टोबर रोजी नागपूर मधील दीक्षाभूमी येथे ७ लाख अनुयायांना दीक्षा दिली होती.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
संदर्भ आणि नोंदी
- ^ अविनाश साबापुरे, लोकमत न्यूझ नेटवर्क. "पुण्यापाठोपाठ चंद्रपूरचेही नाव बदला". 2018-11-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-11-16 रोजी पाहिले.