घोडाझरी वन्यजीव अभयारण्य
घोडाझरी अभयारण्य हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक प्रस्तावित अभयारण्य आहे. हे अभयारण्य ब्रम्हपुरी वनविभागात येते. या अभयारण्याचे प्रस्तावित क्षेत्र सुमारे १५९.५८३ चौ. किमी राहणार आहे. या क्षेत्रात सात बहिणी पहाड, मुक्ताई देवस्थान व धबधबा समाविष्ट असतील.
महाराष्ट्र राज्य शासनाने हे क्षेत्र अभयारण्य म्हणून जाहीर करण्यासाठी मान्यता दिली आहे.
या निर्माणाधीन परिसरात सध्या वाघ, बिबट्या, रानगवा, चितळ, सांबर, नीलगाय, रानडुक्कर, कोल्हा, माकड, ससा, इत्यादी वन्यप्राणी आहेत.