घोंगल्या फोडा (पक्षी)
घोंगल्या फोड
Anastomus oscitans (Boddaert) या पक्ष्याचे इंग्रजी नाव Openbil stork असे आहे.याला मराठीमध्ये अनेक नवे आहेत. गुजे,गोजे,घोंगल्या फोड,घोंगल्या खाई ढोकरू,बुज्या,भुज्या,लहान बुज्या, खुबाला,खुबल स्त्री,उघड्या चोचीचा करकोचा ,उघड तोंड बलाक. हा आकाराने मोठ्या बदकएवढा असतो.हा पांढरा किवा करड्या रंगाचा लहान ढोक असतो.याचे पंख काळे असतात.दुरून हा पक्षी बहाडा ढोकासारखा दिसतो.कमानदार चोचीच्या दोन्ही भागात फट असते.चोचीच्या या विशिष्ट रचनेमुळे त्याची ओळख पटते.नर-मादी दिसायल सारखेच असतात. घोंगल्या फोडा भारत व श्रीलंका येथे स्थलांतर करतो.हा सरोवरे,नद्या,दलदली,आणि भातशेती या ठिकाणी आढळतो.