Jump to content

घोंगडी

घोंगडी, घोंगडे किंवा कांबळे हे महाराष्ट्रात प्राचीन काळापासून वापरले जाणारे अंथरूण आणि पांघरूण आहे. याचा उपयोग ग्रामीण भागात विशेषतः होतो. घोंगडी किंवा कांबळे म्हणजे सामान्यपणे कच्च्या लोकरीपासून बनविलेले सैलसर विणीचे जाडेभरडे कापड. हे बहुधा काळे वा करडे असून अंथरण्या-पांघरण्यासाठी वापरतात. रुंदीच्या दिशेत दोन घोंगड्या शिवून बनविलेल्या वस्त्राला कांबळा म्हणतात.[]

आयुर्वेदात उल्लेखणीय असलेली आणि सणासुदीला उपयोगात येणारी,आपल्या आजोबांची घोंगडी ही सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

पारंपारिक खड्डा मागावर घोंगड्या बनवणारे अस्सल ग्रामीण धनगर कलाकार आज बोटांवर मोजण्या इतपत राहिलेले आहेत. आज महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, बिहार भागातील शेवटच्या पिढीतील कलाकार अखेरची घटका मोजत आहेत.

घोंगडी व जेन कशासाठी?

  • पाठदुखी व कंबरदुखी पासून मुक्त व्रुद्धापकाळासाठी
  • वात आणि सांधेदुखी वर भरपूर आराम मिळण्यासाठी
  • व्यवस्थित रक्ताभिसरण व उच्च रक्तदाब नियंत्रणास मदत करण्यासाठी,
  • निद्रानाश आणि शांत झोपेस व्याधी येणे कमी होते व रात्रभर गाढ झोप लागते
  • शरीराच्या तापमानावर नियंत्रण व उष्णतेसंबंधी शारीरिक आजार कमी होतात.
  • योगा, ध्यानधारणा, बैठक व साधनेच्या सफल पूर्ततेसाठी उपयुक्त मानली जाते.
  • पारायणं, तळी-भंडारा, जागरण गोंधळ, सत्यनारायण तसेच विविध दैविक विधी व कार्यक्रमात घोंगडीला मोलाचा मान असतो.

पुराणातील घोंगडी

  • आध्यात्मिक साधना, ध्यान-धारणा, योग आणि मंत्राचे अनुष्ठान करण्यासाठी असलेले घोंगडीचे महत्त्व हे ऋषींनी आणि संत महात्म्यांनी पुराणकाळापासून वर्णलेले आहे. शरीरातील उर्जा आणि तापमान नियंत्रित राहत असल्याने घोंगडी वर केलेल्या साधनेतून अत्युच्च मानसिक समाधान मिळते. श्री गुरुचरित्र पारायण, श्री गुरूलीलामृत, श्री गजानन विजय, श्री साईं सत्चरित्र, श्री दुर्गा सप्तशती आणि इतर सर्व आध्यात्मिक साधना व मंत्रांच्या अनुष्ठानासाठी घोंगडीचा उपयोग करावा.

संदर्भ आणि नोंदी