घेवडा
ही भारतात उगवणारी एक भाजीची वनस्पती आहे. या वनस्पतीच्या एका प्रकारास श्रावणात शेंगा येतात म्हणून त्या प्रकारास 'श्रावणघेवडा' म्हणतात. श्रावणघेवड्यास कोल्हापुरात बिनीस, इंग्रजीत फ्रेंच बीन्स आणि हिंदीत फरसबी म्हणतात. घेवड्याच्या शेंगाची भाजी करतात.
शास्त्रीय नाव - Dolichos lablab, संस्कृतमध्ये अङ्गुलफल. घेवड्याचे अन्य प्रकार : काळा घेवडा, बाजीराव घेवडा, बोंबल्या घेवडा, वगैरे.