घेता
कविवर्य विंदा करंदीकर यांची घेता ही कविता मराठी साहित्यात महत्वपूर्ण मानली जाते. या कवितेत सुंदर निसर्ग रुपके आहेत. मानवाला इतके घे की देणारा होशील असाही संदेश ही कविता देते.
घेता
देणाऱ्याने देत जावे;
घेणाऱ्याने घेत जावे.
हिरव्यापिवळ्या माळावरून
हिरवीपिवळी शाल घ्यावी;
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.
वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तांमधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे.
उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्याशा भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी.
देणाऱ्याने देत जावे;
घेणाऱ्याने घेत जावे;
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावे!
काव्याकलन
- काव्यालकन हा लेख अपूर्ण आहे .तो पूर्ण करण्यास मदत करा