Jump to content

घुबड

घुबड
58 Ma
PreЄ
Є
O
S
D
C
P
T
J
K
Pg
N
Late Paleocene – Recent
दुर्मिळ नदर्न स्पॉटेड आऊल स्ट्रिक्स ऑक्सिडेंटॅलिस कॉरिना
दुर्मिळ नदर्न स्पॉटेड आऊल
स्ट्रिक्स ऑक्सिडेंटॅलिस कॉरिना
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पृष्ठवंशी
जात: पक्षी
पोटजात: निअ‍ॅओर्निथ्स
वर्ग: स्ट्रायजिफॉर्मिस
Wagler, 1830
Families

स्ट्रायजिडी
टायटोनिडी
Ogygoptyngidae (fossil)
Palaeoglaucidae (fossil)
Protostrigidae (fossil)
Sophiornithidae (fossil)

इतर नावे

Strigidae sensu Sibley & Ahlquist

ऑउल्स क्रिग्निफोर्म्सच्या क्रमात आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने एकटे व रात्रीच्या जवळजवळ 200 प्रजातींचा समावेश आहे जो प्रत्यक्ष दृश्याद्वारे, मोठ्या, विस्तृत डोक्यावर, दूरबीन दृश्यासाठी, बायनॉरल ऐकणे, तीक्ष्ण ताकद आणि मूक फ्लाइटसाठी (विमानासारखी) अनुकूल पंख. अपवादांमध्ये दुपारचे उत्तरी हॉक-उल्लू आणि ग्रॅग्रीअस बोरोइंग उल्लू समाविष्ट आहे.

वर्णन

घुबड हा शिकारी पक्षी वर्गातील प्रमुख पक्षी आहे. घुबडे बहुधा एकाकी आणि निशाचर असतात (अपवाद:बरोविंग घुबड). घुबडाच्या जवळजवळ २०० प्रजाती आहेत.

खाद्य

घुबडे प्रामुख्याने सस्तन प्राणी, कीटक आणि पक्षी यांची शिकार करतात तरी काही प्रजातींनी मासे मारण्यात कौशल्य प्राप्त केले आहे.

आढळस्थान

अंटार्क्टिका, बहुतांश ग्रीनलॅंड आणि काही दूरस्थ बेटे वगळता घुबडे पृथ्वीवर सर्वत्र आढळतात. घुबड हा शिकारी वर्गातील प्रमुख पक्षी आहे. तसेच घुबडाला बुद्धिमान पक्षीसुद्धा हो म्हणले जाते. घुबडाला भूत आणि भविष्य दोन्हीचे ज्ञान आधीपासूनच आहे असे म्हणले जाते. घुबडाच नाव घेतलं कि, बऱ्याच लोकांना भीती वाटते. दिवसें -दिवस घुबड हा पक्षी नामशेष होत चालला आहे.

1) घुबडाला भारतीय संस्कृतीमध्ये शुभ आणि धनसंपत्तीचे प्रतीक मानले जाते. परंतु बरेच लोक घुबडला भीत असल्या -मुळे या भीतीपोटीच त्याला अशुभ मानले जाते.

2) घुबड लक्ष्मी देवीचे वाहन आहे. तरीसुद्धा काही लोक घुबडाला अशुभ मानतात. परंतु घुबड हे अशुभ नाही. तरीसुद्धा घुबड विषयी काही लोकांचा गैरसमज आहे.

3) घुबड हे निशाचर असल्यामुळे जेव्हा सर्व जग झोपते तेव्हा जागा होतो. हेच घुबडचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. कारण घुबडाला दिवसा दिसत नाही म्हणून ती रात्री भक्ष्य शोधण्यासाठी फिरते.

4) घुबड आपली मान 170° फिरवतात तसेच रात्री उडताना त्यांच्या पंखांचा आवाज अजिबात होत नाही आणि त्यांच्या डोळ्याच्या पापण्या कधीही मिटत नाही.

5) घुबडच्या जवळजवळ 200 प्रजाती आहे. घुबडे प्रामुख्याने सस्तन प्राणी आहेत. कीटक आणि पक्षी यांची शिकार करतात तरी काही प्रजातीनी मासे मारण्यात कौशल्य प्राप्त केले आहे.

6) अंटार्टिका बहुतांशी इंग्लंड आणि काही दुरस्त बेटे वगळता पृथ्वीवर सर्वत्र घुबडे आढळतात.

7) घुबड एक असा पक्षी आहे जो शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतो. तो रात्री शेतातील उंदीर, साप, विंचू त्यांची शिकार करत असल्यामुळे, जेव्हा शेतात घुबड असेल त्यावेळेस हे शेतात येणार नाहीत. तसेच लहान-मोठे कीटक खाऊन सुद्धा कीटकांची संख्या प्रमाणात ठेवण्याचे काम करतो.

7) भारतात घुबडांच्या 60 प्रजाती आणि उपप्रजाती आढळतात. सर्वात छोटे घुबड एल्फ आऊल आहे. त्याची उंची पाच ते सहा इंच असते. तर सर्वात उंच घुबड ग्रेट ग्रे आऊल आहे. ज्याची उंची 32 इंच पर्यंत असू शकते.

8) घुबडच्या डोळ्यांची रचना इतर पक्षांच्या तुलनेत जरा वेगळीच असते घुबडाचे डोळे समोर असतात आणि त्यांची रचना गोल नसून ट्यूब सारखी असते.

9) त्यामुळे ते एखाद्या दुर्बिणी प्रमाणे दूर पर्यंत बघू शकतात. तीन घडीच्या पापण्या असतात. त्यातील एक झोपण्यासाठी आणि एक डोळ्याला साफ ठेवण्यासाठी असते. मोठ्या डोळ्यामुळे ते रात्री सुद्धा स्पष्ट बघू शकता परंतु जवळचे मात्र त्यांना अस्पष्ट दिसते.

10) घुबड डोळे हलवू शकत नाही. म्हणून आजूबाजूला बघण्याकरिता तिला डोके पूर्ण फिरवावे लागते. घुबडच्या मानीत 14 मनके असतात. त्याच्यामुळे घुबड त्यांची मान 270 अंश फिरवू शकतात.

11) घुबडाची ऐकण्याची क्षमता देखील अतिशय उत्तम असते. घुबडांचे कान असमान असतात आणि डोक्यावर वेगवेगळ्या अंतरावर असतात. ज्यामुळे ध्वनीलहरींमधील थोडासा फरक सुद्धा त्यांना सावजाचे अचूक ठिकाण ओळखण्यास मदत करतो.

12) घुबडांच्या डोक्यावर असलेली पिसे सुद्धा घुबडाला ध्वनीलहरींना दहापट मोठे करून कानापर्यंत पोहचवतात.

13) घुबडांच्या पंखावरील केसांची रचना अशी असते की, उडताना त्यांच्या पंखांचा आवाज अजिबात होत नाही.

14) काही घुबड त्यांच्यापेक्षा छोट्या जातीच्या घुबडांची शिकार करतात. बार्न आऊल या प्रजातीची घुबड छोट्या घुबडांना अक्खी गळून घेतो. हा वर्षभरात सुमारे 1000 उंदीर खातो. उंदीर हे त्याचे आवडते खाद्य असल्यामुळे, शेतकऱ्याचा मित्र सुद्धा घुबडला समजले जाते.

15) घुबडचा चेहरा गोल चपटा असतो आणि त्यांची चोच लहान असली तरी ती खूप शक्तिवान असते. तसेच घुबड सर्वात आधी मोठ्या शक्तिशाली पिल्लांना अन्न पुरवतो व नंतर कमजोर पिलांना अन्न पुरवतो. हे पिल्ले मोठी झाल्यावर उडून जवळपासच्या झाडावर राहायला जातात. तिथे ही काही वेळा हे घुबड पिल्लाला अन्न पुरवतो.

16) दिवसा घुबड आजूबाजूच्या वातावरणा प्रमाणे स्वतःला बदलतात आणि आरामात राहतात.

17) घुबड स्वतःच्या रक्षणासाठी खूप भयावह आवाज काढू शकतो. घुबडच्या पायाला पुढे दोन व मागे दोन धारदार नखे असतात. ज्यामुळे त्यांना शिकार जखडून ठेवण्यास मदत होते. मादी घुबड नरापेक्षा मोठी असते आणि जास्त आक्रमक असते.

18) मादी ही नरापेक्षा जास्त आकर्षक रंगाची असते व तिचा आवाजही नरापेक्षा मोठा असतो आणि त्यांना एक मैल पर्यंत एकता येऊ शकतो.

19) गव्हाणी घुबड किंवा कोठीचे घुबड हा जगातील सर्वात जास्त आढळणारा पक्षी आहे. ध्रुवीय आणि वाळवंटी प्रदेश, आशियातील हिमालयाच्या उत्तरेकडील भाग, इंडोनेशिया आणि पॅसिफिक महासागरातील काही बेटे सोडली तर संपूर्ण जगात हा पक्षी आढळतो.

20) भारतात ह्या घुबडांच्या मुख्य दोन उपजाती आहेत. गव्हाणी घुबड पक्षी साधारणता 36 सेमी आकाराचा आहे. पाठीकडून सोनेरी, बदामी आणि राखाडी रंगाचा त्यावर काळ्यापांढऱ्या रंगाचे पट्टे असलेला पोटाकडे मुख्यत्वे रेशमी पांढरा रंग त्यावर बदामी रंगाची झाक आणि गडत तपकिरी रंगाचे ठिपके असतात.

21) डोकेवर गोलसर आकाराचे काहीसे माकडासारखे असते. चेहऱ्याचा रंग पांढरा बदनामी आणि चोच बाकदार असते. नर-मादी दिसायला तारखेचा साऱ्या पक्ष्यांचा विणीचा निश्चित काळ नाही.

22) जुन्या पडक्या इमारतींच्या कोनाड्यात, झाडांच्या ढोलीत काड्या वापरून तयार केलेले घरटे जमिनीपासून उंच ठिकाणी असते. घरट्यांजवळ दिवसा सावली येऊ शकेल अशा ठिकाणी ते बांधलेले असते.

23) एकच घरटे वर्षानुवर्ष वापरण्याची सवय या पक्षांना असते. मादी एकावेळी पांढऱ्या रंगाची गोलसर चार ते सात अंडी देते. त्यांचे उंदीर, घुशी, सरडे, पाली हे मुख्य खाद्य आहे.

24) पिंगळा घुबड हा भारतीय घुबड जातीच्या पक्ष्यांपैकी आकाराने सगळ्यात लहान पक्षी आहे. तो मानवी वसाहतीजवळ राहणे पसंत करीत असल्याने सर्वत्र परिचित आहे. पिंगळा पक्षी आकारणे साधारणपणे मैना पक्षी एवढी त्याची लांबी 21 सेमी असते.

25) पिंगळा घुबडाचे डोके गोल वाटोळे असते आणि मानेवर तुटक पांढऱ्या रंगाच्या रेषा असतात. त्याची चोच बाकदार शिकार पकडण्यासाठी आणि मास फाडण्यासाठी उपयुक्त तर डोळे पिवळी असतात.

26) पिंगळा घुबड मध्ये नर-मादी दिसायला सारखेच असतात. सर्व घुबड क्रमानेच पिंगळा सुद्धा आपली मान दोन्ही बाजूंनी 280° फिरू शकतो. त्यामुळे आपल्या मागे काय चालू आहे ते क्षणात पाहू शकतो. अंधारात राहण्यासाठी कान आणि डोळे अनुकुल झाले असल्याने, लहानात लहान आवाजाच्या दिशेने पिंगळा पक्षी रोखून पाहतो. याच्या रंग आणि आकारावरून तीन उपजाती आहेत.

27) पिंगळा सुद्धा निशाचर आहे. तो दिवसा जुन्या आरमारमध्ये झाडांच्या ढोलीत तसेच संधी असल्यास जुन्या घरात, जुन्या मोठाल्या घरातील छताच्या आश्रयाने राहणे पसंत करतो.

28) घनदाट वृक्षाच्या परिसरात पिंगळा कमी आढळतो. साधारणपणे नोव्हेंबर ते मार्च एप्रिल हा काळ पिंगळा पक्षांच्या वीणीचा काळ असून त्यांचे घरटे झाडाच्या ढोलीत जुन्या इमारतीच्या छिद्रात कडे-कपारीत मिळेल त्या साधनांनी बनवलेले असते किंवा त्यांचे वास्तव्य दुसऱ्या पक्षांनी सोडून दिलेल्या घरट्यात सुद्धा असते.

29) ही मादी एका वेळी तीन ते चार पांढुरक्या रंगाची अंडी देते. ते उबविण्या -साठी पिल्लांचे संगोपन आतापर्यंत सर्व कामे नर-मादी मिळून करतात.

30) हे पक्षी रात्रीच्या वेळी बेंडूक लहान पक्षी पाली उंदीर आणि लहान प्राण्यांची छोटी पिल्ले त्यांची शिकार करतात.

31) रानपिंगळा घुबड हा पक्षी महाराष्ट्र प्रदेशात व बाजूच्या मध्य प्रदेशात खूप मोठ्या प्रमाणात आढळून येत होता. परंतु आता विविध कारणाने तो दिसेनासा झाला आहे.

32) अलीकडेच पक्षी अभ्यासकांच्या एका टीमने शोध घेतला असता, तो नंदुरबार जिल्ह्यात व मेळघाट जिल्ह्यात दोनशे-तीनशे पक्षी एवढ्याच संख्यात तो आढळला.

33) हुमा घुबड हा 58 सेमी, उंचीचा पिसांची शिंगी असलेला मोठा घुबड पक्षी आहे. याचा मुख्य रंग भुरकट राखाडी असून याचे डोळे मोठे पिवळ्या रंगाचे असतात.

34) हुमा घुबड बसल्यावर त्यांच्या डोक्यावरील पिसे शिंगा सारखेवर एकमेकां जवळ येतात.

35) हुमा घुबड आणि एकदा जोडी जमली की प्रती कित्तेक वर्ष एकाच ठिकाणी राहतात.

36) भारताशिवाय बांगलादेश, चीन, मलेशिया म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, थायलंड या देशातही आढळतो.

घुबडांची अंधश्रद्धा चुकीची

या पक्ष्यांचा अधिवास स्मशानात सर्वाधिक असतो. कारण ढोली असलेली, स्थानिक प्रजातींची मोठी झाडं तेथे असतात. त्यांचे डोळे लाल गडद असतात म्हणून लोक भितात. तसेच त्यांच्याबद्दल अंधश्रद्धा पसरवतात. घुबडाला मारण्याचे प्रकार होतात. घुबड हे अशुभाचे प्रतीक आहे, ही अंधश्रद्धा थांबवली पाहिजे.

काही परिचित घुबडे