Jump to content

घुटमळणारे क्षेपणास्त्र

घुटमळणारे क्षेपणास्त्र हे क्षेपणास्त्र मानवरहित विमानाप्रमाणेच राहते.हे क्षेपणास्त्र आकाराने लहान असते.शत्रुच्या प्रदेशात जाउन, ते आपल्या लक्षावर सुमारे अर्धा तास घुटमळते,टेहळणी करून त्याची माहिती मुख्य नियंत्रण कक्षास पाठविते.नियंत्रण कक्ष क्षेपणास्त्राने पाठविलेल्या माहितीची खात्री करते मग क्षेपणास्त्रास दिलेल्या निर्देशाप्रमाणे व प्राप्त झालेल्या संदेशाप्रमाणे ते लक्ष्यावर जाउन आदळते.हे क्षेपणास्त्र स्वयंलक्ष्यनिर्धारण पद्धतीचे आहे. ते ७० कि.मि. लांब जाउन सुमारे ३० मिनीटे लक्ष्यावर घुटमळु शकते.

अशा प्रकारची क्षेपणास्त्रे ट्रकवर लादुनही प्रक्षेपित केल्या जाऊ शकतात.अपरोक्ष युद्धनीतीमध्ये याची महत्त्वाची भूमिका आहे.