Jump to content

ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम

जीपीएस तंत्रज्ञानात वापरणारे उपग्रहाचे जाळे

अंतराळातल्या उपग्रहांच्या साहाय्याने एखादे ठिकाण आणि तिथली वेळ शोधून काढणे, वातावरणातले बदल तपासणे यासाठी अमेरिकेने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम म्हणजे जागतिक स्थिती प्रणाली (जीपीएस) प्रणाली विकसित केली होती. पण नंतर तिचा उपयोग इतरही महत्त्वाच्या गोष्टींसाठी होऊ लागला.

उपयोगिता

ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमद्वारे आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणाची नेमकी माहिती मिळते. त्यात ते ठिकाण आपण उभे असलेल्या ठिकाणापासून किती दूर आहे, तिथे पोहोचण्यासाठी किती मार्ग उपलब्ध आहेत आणि तिथे पोहोचण्यासाठी किती वेळ लागू शकतो अशी माहिती जीपीएस उपकरणाच्या पटलावर एका बटनाद्वारे मिळू शकते. जीपीएस तंत्रज्ञानात उपग्रहाद्वारे माहिती मिळत असल्याने अगदी रोजच्या रोज होणारे बदलही टिपले जातात. या सुविधेमुळे नेमके ठिकाण शोधणे अधिक सोपे बनते. उदा. एखाद्या कार्गो कंपनीला कुठे, किती गोष्टींची आवश्यकता आहे ते पाहण्यासाठी, औषधी झाडांचा शोध घेण्यासाठी, एखाद्या घराचा पत्ता शोधण्यासाठी, रस्त्याचं, इमारतीचं नकाशा तयार करण्यासाठी अशा विविध गोष्टींसाठी जीपीएसची आवश्यकता भासू लागली. त्यामुळे त्याचं व्यवसायीकरण झालेले आहे.

कार्यपद्धती

जीपीएस तंत्रज्ञानात उपग्रहाद्वारे माहिती

अमेरिकेने सुरुवातीला त्यांच्या संरक्षण विभागासाठी सुमारे (२८) उपग्रह अवकाशात सोडले होते. आता त्याची एकूण संख्या ३२ च्या घरात आहे. नंतर हे सर्व उपग्रह नागरी उपयोगासाठी वापरण्यात येवु लागले. प्रत्येक जी.पी.एस. सिस्टिम या उपग्रहांकडुनच पृथ्वीची सर्व भौगोलिक माहिती जमा करत असते. जीपीएस यंत्र जिथे असेल त्या जागेवर उपग्रहांकडून मिळणाऱ्या संदेशांचा उपयोग करून त्या विशिष्ट जागेचे अक्षांश, रेखांश आणि त्या जागेची समुद्रसपाटीपासुनची उंची देते. या तिन्ही गोष्टी कुठल्याही स्थळाचे/जागेचे नकाशावरील (जगाचा नकाशा) स्थान निश्चित करत असते. सर्वसाधारण जीपीएस यंत्रणा ५ ते १० मीटर किंवा जास्तच अचुकता देते. म्हणजे जी.पी.एस. ने दिलेल्या बिंदूपासून ती नेमकी जागा ५-ते १० मीटरच्या परिसरात कुठेही असु शकते. आता तुम्ही म्हणाल एवढा जर फरक पडत असेल तर काय उपयोग? तर अचुकता वाढवण्यासाठी पडताळणी तंत्र वापरली जाते. म्हणजे एकाच्या ऐवजी दोन किंवा जास्त जी.पी.एस. प्रणाली वापरून त्यांच्यापासून मिळालेल्या माहितीची सरासरी काढून जास्तीत जास्त अचुकता मिळवली जाते.

इतर देशांची या क्षेत्रातील यंत्रणा

  • ग्लोनॉस- रशिया विससित करत असलेली जीपीएस प्रणाली.GLONASS
  • गगन (जियो ऑग्मेंटेड नेविगेशन प्रणाली)- भारत विकसित करत असलेली जीपीएस प्रणाली.गगन जीपीएस
  • डोरिस (जिओडेसी)- फ्रांस देश विकसित जीपीएस प्रणालीDORIS-Geodesy
  • बेइडाऊ - चीनने तयार केलेली जीपीएस प्रणाली Beidou
  • क्युझेडएसएस- जपान विकसित करत असलेली जीपीएस प्रणाली.QZSS
  • गॅलेलिओ - युरोपियन समुदाय विकसित करत असलेली जीपीएस प्रणाली.Galileo (satellite navigation)
  • नाविक - भारत विकसित करत असलेली जीपीएस प्रणाली