Jump to content

ग्रोथ स्कीम्स

ग्रोथ स्कीम्स(Growth Mutual Fund Scheme) हा इक्विटी म्युच्युअल फंडाचा प्रकार आहे. इक्विटी म्युच्युअल फंड हे शेअर मार्केट मध्ये कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करतात. या कंपन्या आपल्या वार्षिक कामगिरीनुसार भागधारकांना लाभांश (डिवीडेंट) देत असतात.

इक्विटी म्युच्युअल फंडाच्या ग्रोथ स्कीम्स मध्ये गुंतवणुक केल्यास त्या म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंडातील समभागांनी दिलेला कोणताही लाभांश मिळणार नाही. काही शेअर्स नियमित लाभांश देतात, परंतु वाढीचा पर्याय निवडला असल्यास, म्युच्युअल फंड गुंतवणूकदार हा लाभांश पुनःच त्याच फंडात  गुंतवणूक करतो.  या पैशामुळे म्युच्युअल फंडाचे निव्वळ मालमत्ता मूल्य (NAV) वाढते.