ग्रेट लीप फॉरवर्ड
ग्रेट लीप फॉरवर्ड (चीनी :中國武術पिन्यिन中國武術) तथा महान प्रगत झेप ही चीन मधील एक सामाजिक व आर्थिक मोहीम होती. चीनच्या साम्यवादी पक्षाद्वारे ही मोहीम १९५८ ते १९६२ च्या दरम्यान राबवण्यात आली. अध्यक्ष माओ झेडॉंग प्रणित या मोहिमेंतर्गत चीनच्या अर्थव्यवस्थेचे शेतीप्रधान अर्थव्यवस्थेतून समाजवादी अर्थव्यवस्थेत रूपांतर करण्यात आले. यासाठी जलद औद्योगिकीकरण केले गेले. यामुळे चीनमध्ये मोठा दुष्काळ पडला.
ह्या मोहिमेमुळे ग्रामीण चीनी लोकांच्या जीवनातील महत्त्वाचे बदल म्हणजे जब्रण शेती एकत्रीकरणाचे वाढते घुसडण. खासगी शेती वर बंदी घालण्यात आली होती, व जी लोक ती पार पडत त्यांचा छळ करून त्यांना प्रति-क्रांतिकारी घोषित करण्यात येत असे. ग्रामीण लोकांवर ह्या अटी सार्वजनिक श्रम सत्र घेऊन व सार्वजनिक ताण आणून लादल्या जात होत्या. लोकांना सक्तीचा कष्ट सुद्धा करावा लागला होता. ग्रामीण औद्योगिकीकरण, जे मोहिमेचं प्राध्यान्य होत, त्याला मोहिमेंच्या चुकांमुळे निरस्त करण्यात आलं.
जगातील अनेक इतिहासकारांने म्हणले आहे की ग्रेट लीप फॉरवर्ड मुळे करोडो लोकांचा जीव गेला.[१] किमान अंदाज हा १ कोटी ८० लाख, व यु शिग्वांग ह्याच्या विस्तृत संशोधनाने मोहिमे मध्ये झालेल्या मृत्यूंची संख्या साडे पाच कोटीच्या सुमारास सांगितली आहे.[२] इतिहासकार फ्रांक दिकोतर म्हणतो की ग्रेप लीप फॉरवर्ड ह्याचा पाया "जबरदस्ती, आतंक व पद्धतशीर हिंसा" ह्यामध्ये होता, व त्यामुळे "मानवी इतिहासातील सर्वात प्राणघातक बहुसंख्य मारहाण" झाली. [३]
ग्रेट लीप फॉरवर्डच्या दरम्यान चीनच्या अर्थव्यवस्थेचे प्रतिगमन झाले. १९५८ - १९६२ हा त्या दोन पैकी एक काळ होता (दुसरा म्हणजे चीनची सांस्कृतिक क्रांती) जेव्हा चीनची अर्थव्यवस्था संकुचित झाली. राजनीतिक अर्थतज्ञ द्वाइत पर्किन्स म्हणतो "भव्य गुंतवणूक करण्यात आली ज्याच्या बदल्यात थोडेफार.. किव्वा शून्य उत्पादन वाढले. थोडक्यात ग्रेट लीप फॉरवर्ड ही चांगलीच महाग आपत्ती होती. [४]
मार्च १९६० व मे १९६२ च्या संमेलनांमध्ये, मोहिमेचे नकारात्मक परिणामंचा कॉम्मुनिस्ट पार्टी ऑफ चायना ह्यांने अभ्यास केला व माओ झीडोंग ह्यांच्यावर मोठ्या पातळीवर टीका करण्यात आली. पक्षातील माफक (मोडरेट) सदस्य जसे राष्ट्रपती लियू शाओकी व देंग शाओपिंग हे सत्ते मध्ये आले, व अध्यक्ष माओंना पक्षात मर्यादित करण्यात आले, ज्यामुळे त्यांनी १९६६ला सांस्कृतिक क्रांतीची सुरुवात केली.