ग्रेट बार्बेट (पक्षी)
ग्रेट बार्बेट तथा एशियन बार्बेट हा एक हिमालयीन पक्षी आहे. बार्बेट्स हा पक्षांचा गट पासेरीन गटाशी साधर्म्य असणारा आहे. बार्बेट्स जातीच्या गटातील पक्षी जगभरात उष्णकटिबंधात आढळतात. या पक्ष्याचे नाव त्याच्या चोचीवर असलेल्या मिशांवरून पडले आहे.
वर्णन
या पक्षाचा आकार ३१ ते ३३ सें.मी आणि वजन १९२ ते २९५ ग्रॅम असते. हा पक्षी गुबगुबीत असतो. त्याची मान आखूड असून, डोके मोठे आणि शेपटी लहान शेपटी असते. डोके निळे, चोच मोठी व पिवळी आणि छाती आणि पाठ तपकिरी असते. पिवळ्या पोटावर हिरवे पट्टे आणि गुदद्वार लाल असते. ग्रेट बार्बेटचा उरलेला पिसारा हिरवा असतो. नर,. मादी आणि पिलू सारखेच दिसते.
निवासस्थान आणि पैदास
हिमालयीन पक्षी असल्याने ग्रेट बार्बेट हा नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि भारताच्या उत्तर सीमेवर आढळतो. पक्षाचा घरटी बांधणयाचा काळ एप्रिलपासून जुलैपर्यंत असतो. ही प्रजाती विशेषतः झाडांच्या छिद्रामध्ये घरटे बनवते. नर आणि मादी पक्षी हे दोघेही पिलांचे पालन पोषण करतात.