ग्रुपो सान्तान्देर
ग्रुपो सान्तान्देर हा स्पेनमधील बँका व इतर आर्थिक कंपन्यांचा समूह आहे. बांको सान्तान्देर ही त्यातील प्रमुख कंपनी आहे. याचे मुख्यालय कांताब्रिया राज्यातील सान्तान्देर येथे आहे.[१] ग्रुपो सान्तान्देरचे समभाग माद्रिद, न्यू यॉर्क, लंडन, साओ पाउलो, बॉयनोस एर्स, मेक्सिको सिटी, वॉर्सो आणि लिस्बन शेर बाजारांमध्ये विकले जातात.
- ^ "Global 2000 Leading Companies 2011". Forbes. 2013-07-14 रोजी पाहिले.