Jump to content

ग्रीन पार्क

ग्रीन पार्क स्टेडियम
मैदान माहिती
स्थानकानपूर, भारत
गुणक26°28′55″N 80°20′52″E / 26.48194°N 80.34778°E / 26.48194; 80.34778गुणक: 26°28′55″N 80°20′52″E / 26.48194°N 80.34778°E / 26.48194; 80.34778
स्थापना१९४५
आसनक्षमता ३३,०००[]
मालक उत्तर प्रदेश सरकार
प्रचालक उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा.१२-१४ जानेवारी १९५२:
भारत  वि. इंग्लंड
अंतिम क.सा.२२-२६ सप्टेंबर २०१६:
भारत  वि. न्यूझीलंड
प्रथम ए.सा.२४ डिसेंबर १९८६:
भारत वि. श्रीलंका
अंतिम ए.सा.११ ऑक्टोबर २०१५:
भारत वि. दक्षिण आफ्रिका
एकमेव २०-२०२६ जानेवारी २०१७:
भारत वि. इंग्लंड
यजमान संघ माहिती
उत्तर प्रदेश क्रिकट असोसिएशन (२००९-सद्य)
शेवटचा बदल ३ नोव्हेंबर २०१६
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

उत्तर प्रदेश क्रिकेट संघाचे होम ग्राउंड असलेले आणि प्रकाशझोताची सुविधा असलेले भारतातील कानपूर शहरामध्ये वसलेल्या ग्रीन पार्क स्टेडियम ह्या बहुउपयोगी मैदानाची आसनक्षमता ३३,००० इतकी आहे. [] सदर मैदान उत्तर प्रदेश क्रीडा विभागाच्या नियंत्रणात आहे. उत्तर प्रदेशतील ह्या एकमेव आंतरराष्ट्रीय मैदानावर अनेक आंतरराष्ट्रीय कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. त्याशिवाय विवो आयपीएलचे २ सामने १९ आणि २१ मे २०१६ रोजी येथे खेळवले गेले होते. जगातील सर्वात मोठा हाताने बदलावा लागणारा धावफलक ह्या मैदानावर आहे. गंगा नदी जवळ वसलेले हे मैदान भारतातील दुसरे सर्वात मोठे मैदान आहे. मैदानाचे नाव हे येथे घोडदौडीला येणारी ब्रिटिश महिला मॅडम ग्रीनच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. ह्या मैदानाचे टोपण नाव 'बिलियर्ड्स टेबल' असे आहे. मैदाना समोर असलेल्या मॅकरॉबर्ट हॉस्पिटलमध्ये जन्मलेला दिवंगत क्रिकेट खेळाडू आणि प्रशिक्षक बॉब वूल्मरच्या आठवणीत सदर मैदानाला वूल्मर्स टर्फ असेही संबोधले जाते.

इतिहास

ग्रीन पार्क मैदान, कानपूर येथे फलंदाजीसाठी उतरताना महेंद्र शुक्ला

१९४० च्या दशकात घोडदौडीचा सराव करणाऱ्या मॅडम ग्रीनच्या नावावरून ह्या मैदानाचे नाव ग्रीन पार्क असे पडले. मैदानाच्या मागून वाहणाऱ्या गंगा नदीच्या किनाऱ्याजवळ कानपूर शहराच्या इशान्येकडील सिव्हिल लाईन्स येथे हे मैदान वसलेले आहे. भारतातील हे एकमेव मैदान आहे जेथे विद्यार्थ्यांसाठी एक गॅलरी उपलब्ध आहे. ग्रीन पार्क वर जगातील सर्वात मोठा हाताने बदलावा लागणारा धावफलक आहे. [] त्याशिवाय मैदानामध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान वापरल्या जाणाऱ्या दोन व्हिडियो स्क्रीन सुद्धा आहेत.

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी विजय डिसेंबर १९५९ मध्ये येथे नोंदवला होता. टर्फवर खेळवला गेलेला हा पहिलाच सामना होता [] ऑफ-स्पिनर जसु पटेल ह्यांची १४ बळींची कामगिरी भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची ठरली.

१९५८/५९ मध्ये सुभाष गुप्तेने वेस्ट इंडीजचे १०२ धावांमध्ये ९ गडी बाद केले, यष्टिरक्षक नरेन ताम्हाणेने झेल सोडल्यामुळे तो केवळ लान्स गिब्सला बाद करु शकला नाही.

१९५७ नंतर ह्या मैदानावर भारताने आजवर फक्त दोन कसोटी सामने गमावले आहेत ते वेस्ट इंडीज विरुद्ध. १९५८ मधील सुभाष गुप्तेची स्वप्नवत कामगिरी वेस हॉलच्या १० बळींमुळे झाकोळून गेली आणि भारताच्या १९८३ च्या विश्वचषक विजयाचा आनंद माल्कम मार्शलच्या भीतीदायक गोलंदाजीने हिरावून घेतला. ह्या मैदानावर सर्वात जास्त कसोटी धावा करण्याचा विक्रम गुंडप्पा विश्वनाथच्या (७७६ धावा) नावावर आहे. ज्यामागोमाग सुनील गावस्कर (६२९ धावा) आणि मोहम्मद अझरुद्दीन (५४३ धावा) ह्यांचा क्रमांक लागतो. कसोटी क्रिकेटमध्य कपिल देवने मैदानावर सर्वात जास्त २१ गडी बाद केले आहेत आणि त्यामागोमाग हरभजनसिंगने २० गड्यांना तंबूत धाडले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने ह्या मैदानावर सर्वाधिक ३४२ धावा केल्या आहेत, त्यान तर विनोद कांबळीने २१७ तर सौरभ गांगुलीने २०८ धावा फटकावल्या आहेत. सर्वात जास्त ९ एकदिवसीय बळी जवागल श्रीनाथ आणि त्यानंतर अजित आगरकरच्या (८ बळी) नावावर आहेत.

सुविधा

ग्रीन पार्क मैदानावरील खेळपट्टी

एंड्स

मैदानाजवळ असलेल्या एल्गिन मिल आणि डीएव्ही कॉलेजमुळे येथील एंडला मिल एंड आणि होस्टेल एंड अशी नावे दिली गेली आहेत.

खेळपट्टी

मैदानाची खेळपट्टी नेहमीच फिरकी गोलंदाजांना मदत करत असलेली आहे. जसु पटेल, सुभाष गुप्ते आदींनी याचा फायदा घेतला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांची यादी

कसोटी सामने

ह्या मैदानांवर खेळवल्य गेलेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.[]

दिनांकयजमान संघविरोधी संघनिकालफरकधावफलक
१२–१४ जानेवारी १९५२भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडपराभूत८ गडी राखूनधावफलक
१२–१७ डिसेंबर १९५८भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजपराभूत२०३ धावाधावफलक
१९–२४ डिसेंबर १९५९भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाविजयी११९ धावाधावफलक
१६–२१ डिसेंबर १९६०भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानअनिर्णित-धावफलक
१–६ डिसेंबर १९६१भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडअनिर्णित-धावफलक
१५–२० फेब्रुवारी १९६४भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडअनिर्णित-धावफलक
१५–२० नोव्हेंबर १९६९भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाअनिर्णित-धावफलक
२५–३० जानेवारी १९७३भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडअनिर्णित-धावफलक
१८–२३ नोव्हेंबर १९७६भारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडअनिर्णित-धावफलक
२–८ फेब्रुवारी १९७९भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजअनिर्णित-धावफलक
२–७ ऑक्टोबर १९७९भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाविजयी२५३ धावाधावफलक
२५–३० डिसेंबर १९७९भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानअनिर्णित-धावफलक
३० जानेवारी – ४ फेब्रुवारी १९८२भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडअनिर्णित-धावफलक
२१–२५ ऑक्टोबर १९८३भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजपराभूत१ डाव आणि ८३ धावाधावफलक
३१ जानेवारी – ५ फेब्रुवारी १९८५भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडअनिर्णित-धावफलक
१७–२२ डिसेंबर १९८६भारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाअनिर्णित-धावफलक
८–१२ डिसेंबर १९९६भारतचा ध्वज भारतदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाविजयी२८० धावाधावफलक
२२–२५ ऑक्टोबर १९९९भारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडविजयी८ गडीधावफलक
२०–२४ नोव्हेंबर २००४भारतचा ध्वज भारतदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाअनिर्णित-धावफलक
११–१३ एप्रिल २००८भारतचा ध्वज भारतदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाविजयी८ गडीधावफलक
२४–२७ नोव्हेंबर २००९भारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाविजयी१ डाव आणि १४४ धावाधावफलक
२२–२६ सप्टेंबर २०१६भारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडविजयी१९७ धावांनीधावफलक

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय

ह्या मैदानांवर खेळवल्या गेलेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.[]

दिनांकस्पर्धासंघ १संघ २विजेतेफरकधावफलकनोंदी
बुधवार, २४ डिसेंबर १९८६द्विदेशीय मालिकाभारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाश्रीलंका११७ धावाधावफलक
बुधवार, २१ ऑक्टोबर १९८७रिलायन्स विश्वचषकश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज२५ धावाधावफलक
बुधवार, २५ ऑक्टोबर १९८९नेहरु चषकभारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारत६ गडीधावफलक
रविवार, ७ नोव्हेंबर १९९३हिरो चषकभारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाभारत७ गडीधावफलकजवागल श्रीनाथ २४-५
रविवार, ३० ऑक्टोबर १९९४विल्स विश्व मालिकाभारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजवेस्ट इंडीज४६ धावाधावफलक
बुधवार, ६ मार्च १९९६विल्स विश्वचषकभारतचा ध्वज भारतझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेभारत४० धावाधावफलक
मंगळवार, ७ एप्रिल १९९८पेप्सी त्रिकोणी मालिकाभारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारत६ गडीधावफलक
सोमवार, ११ डिसेंबर २०००द्विदेशीय मालिकाभारतचा ध्वज भारतझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेभारत९ गडीधावफलक
सोमवार, २८ जानेवारी २००२द्विदेशीय मालिकाभारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारत८ गडीधावफलक
शुक्रवार, १५ एप्रिल २००५द्विदेशीय मालिकाभारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानपाकिस्तान५ गडीधावफलक
रविवार, ११ नोव्हेंबर २००७द्विदेशीय मालिकाभारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानभारत४६ धावाधावफलक
गुरुवार, २० नोव्हेंबर २००८द्विदेशीय मालिकाभारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारत१६ धावांनीधावफलक
बुधवार, २७ नोव्हेंबर २०१३द्विदेशीय मालिकाभारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजभारत५ गडीधावफलक
रविवार, ११ ऑक्टोबर २०१५गांधी-मंडेला मालिकाभारतचा ध्वज भारतदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका५ धावाधावफलकद.आ. ३०३/५; रोहित शर्मा १५० (१३३)

आंतरराष्ट्रीय टी२०

ह्या मैदानांवर खेळवल्या गेलेल्या टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.[]

दिनांकसंघ १संघ २निकालफरकधावफलक
२६ जानेवारी २०१७भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड५ धावाधावफलक

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "कानपूरमध्ये आयपीएलचा ज्वर" (इंग्रजी भाषेत). ३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "ग्रीन पार्क कानपूर टिकेट्स प्रेडिक्शन हायलाईट्स शेड्यूल" (इंग्रजी भाषेत). 2017-12-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "कानपूर बोस्ट्स वर्ल्ड्स लार्जेस्ट मॅन्युएली ऑपरेटेड स्कोअरबोर्ड". इंडिया टीव्ही (इंग्रजी भाषेत). ३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ ग्रीन पार्कने मिळवून दिला भारताला ऑस्ट्रेलियावर पहिला विजय
  5. ^ ग्रीन पार्क, कानपूर / नोंदी / कसोटी सामने / निकाल
  6. ^ ग्रीन पार्क, कानपूर / नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / निकाल
  7. ^ ग्रीन पार्क, कानपूर / नोंदी / आंतरराष्ट्रीय टी२० / निकाल