Jump to content

ग्रासियास

ग्रासियास हे होन्डुरासमधील शहर आहे. लेम्पिरा प्रांताची राजधानी असलेल्या या शहराची स्थापना इ.स. १५३६मध्ये झाली.

१५४४मध्ये या शहरास ऑदेन्सिया दि लोस कन्फाइन्स भागाची राजधानी करण्यात आले परंतु इतरत्र झालेल्या विरोधामुळे १५४९मध्ये राजधानी ॲंटिग्वा, ग्वातेमाला येथे हलविण्यात आली.

ग्रासियामध्ये गरम पाण्याचे झरे आहेत.