ग्रामीण साहित्य संमेलन
ग्रामीण साहित्य संमेलन, ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, दलित आदिवासी ग्रामीण संमेलन, लोकसंवाद ग्रामीण संमेलन, कोळी ग्रामीण साहित्य संमेलन, विभागीय ग्रामीण साहित्य संमेलन, जिल्हा साहित्य संमेलन अशा विविध नावांनी अनेक संस्था ग्रामीण साहित्य संमेलने भरवतात.
त्यांतल्या काही संस्था आणि त्यांनी भरवलेली संमेलने :--
- असोदा (जळगाव जिल्हा) ग्रामीण साहित्य संमेलन.१९८०, संमेलनाध्यक्ष आनंद यादव
- कवि सुधांशु (कै.हणमंत नरहर जोशी) यांनी काढलेल्या सदानंद साहित्य संस्थेतर्फे औदुंबर(जिल्हा सांगली) या गावी दरवर्षी औदुंबर साहित्य संमेलन (सदानंद साहित्य संमेलन) भरते. १९३९ साली कृष्णाकाठच्या (आणि दत्ताचे पवित्रस्थान असलेल्या) औदुंबरला कवी सुधांशू आणि कथाकार म.बा. भोसले यांनी मकरसंक्रांतीदिवशी महाराष्ट्रातले ‘पहिले ग्रामीण साहित्य संमेलन’ भरवले. त्याचे अध्यक्ष होते महामहोपाध्याय द.वा. पोतदार. तेव्हापासून सातत्याने दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी हे संमेलन अत्यंत उत्साहात भरवले जाते. कसलेही राजकारण आणि निवडणूक न घेता या संमेलनासाठी अध्यक्षांना आमंत्रित केले जाते. आतापर्यंत द वा. पोतदारांपासून ते नामदेव ढसाळांपर्यंत अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखक, कवी, समीक्षक आणि विचारवंत या संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. यामध्ये तिथल्या स्थानिक साहित्यिकांनाही व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते, आणि त्यांना ऐकायला पंचक्रोशीतला श्रोतृवर्ग मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने येत राहिला आहे. आता अशी ग्रामीण साहित्य संमेलने विटा, शिराळा, पलुस, इस्लामपूर, जत अशा सांगलीच्या ग्रामीण भागांतही भरवली जातात.
- उचगाव, कडोली, काडदगा (चिकोडी जिल्हा), कुद्रेमुख, चामरा, बाळेकुंद्री, बेळगल्ली, मंडोळी, माविगड, येळ्ळूर, अशा कर्नाटकातल्या दहा गावांमध्ये दरवर्षी ग्रामीण मराठी साहित्य संमेलने भरवली जातात.
- कारदगा येथील साहित्य विकास मंडळातर्फे १ डिसेंबर २००२ रोजी ?वे कादरगा ग्रामीण साहित्य संमेलन. संमेलनाध्यक्ष - वामन होवाळ
- कारदगा येथील साहित्य विकास मंडळातर्फे २९ नोव्हेंबर २०१४ रोजी १९वे कादरगा ग्रामीण साहित्य संमेलन. संमेलनाध्यक्ष -
- कारदगा येथील साहित्य विकास मंडळातर्फे २९ नोव्हेंबर २०१५ रोजी २०वे कादरगा ग्रामीण साहित्य संमेलन. संमेलनाध्यक्ष -
- कारदगा येथील साहित्य विकास मंडळातर्फे २६ नोव्हेंबर २०१७ रोजी २२वे कादरगा ग्रामीण साहित्य संमेलन. संमेलनाध्यक्ष - राजन खान. हे साहित्य संमेलन सात सत्रांत झाले.
- मळेकरणी साहित्य अकादमी आणि उचगाव ग्रामस्थ यांनी आयोजित केलेले १६वे उचगांव साहित्य संमेलन २१-१-२०१८ रोजी उचगांव येथे झाले. संमेलनाध्यक्षपदी सातारा येथील डॉ. प्राचार्य राजेंद्र कुंभार होते. या संमेलनामध्ये डॉ. संजय कळमकर यांचे कथाकथन झाले.
- १ ले मराठी साहित्य संमेलन, कालकुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर दि. १८ मार्च २०१६, संमेलनाध्यक्ष - प्रा. चंद्रकुमार नलगे (संपादक, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर)
- मराठवाडा साहित्य परिषदेचे १ले ग्रामीण साहित्य संमेलन, केज (जिल्हा बीड), एप्रिल २०११, संमेलनाध्यक्ष भास्कर चंदनशिव
- मराठवाडा साहित्य परिषदेचे २रे ग्रामीण साहित्य संमेलन, केज (जिल्हा बीड), १३-२-२०१२, संमेलनाध्यक्ष डॉ.सतीश सोळुंके
- केज येथे मराठवाडा साहित्य परिषद व जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, जीवन शिक्षण परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने २७-१-२०१८ रोजी भरलेले ६वे मराठी साहित्य संमेलन, संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे होते.
- खेड (रत्नागिरी जिल्हा) - खेड येथील एकदिवसीय साहित्य संमेलन. २० ऑक्टोबर २०१३. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुमेध वडावाला
- ५वे (पश्चिम महाराष्ट्र)ग्रामीण साहित्य संमेलन, चांदवड (जिल्हा नाशिक), जुलै १९८५
- जत येथील मराठी साहित्य सेवा मंचातर्फे भरवलेले १७वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, येळवी (तालुका जत, जिल्हा सांगली), ८-१-२०१२, संमेलनाध्यक्ष बाबासाहेब सौदागर
- जुन्नर (पुणे जिल्हा) ग्रामीण साहित्य संमेलन, १९८०, संमेलनाध्यक्ष आनंद यादव
- निमशिरगाव परिसर साहित्यिक संघ, साहित्यसुधा मंच आणि निमशिरगाव ग्रामस्थांच्या वतीने प्रति वर्षी घेतले जाणारे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन यंदा ६ जानेवारी २०१९ रोजी निमशिरगाव येथे झाले. हे संमेलनाचे २२वे वर्ष असून, संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे होते.
- पलूस ग्रामीण साहित्य संमेलन (२०१२), संमेलनाध्यक्ष - डाॅ. रवींद्र ठाकूर
- एकदिवसीय मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन २-२-२०१२ रोजी पळसप (तालुका व जिल्हा उस्मानाबाद) येथे झाले. संमेलनाध्यक्ष प्रा.भास्कर चंदनशिव होते.
- वसंतराव काळे प्रतिष्ठान व किसान वाचनालय पळसप यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात येणारे २ रे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन पळसप (तालुका व जिल्हा उस्मानाबाद) येथे २ फेब्रुवारी २०१३रोजी भरले होते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर होत्या.
- ५वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन २ फेब्रुवारी २०१६ रोजी पळसप ता. जि.उस्मानाबाद येथे भरले होते.अध्यक्षपदी ज्येष्ठ कथाकार, कवी डॉ. जगदीश कदम हे होते.
- पाथर्डी (जिल्हा अहमदनगर) ग्रामीण साहित्य संमेलन, अध्यक्ष कवी प्रकाश घोडके
- १७वे पाथर्डी साहित्य संमेलन अध्यक्ष :डाॅ.कैलास दौंड. २३व २४डिसेंबर १७ (पाथर्डी जिल्हा अहमदनगर )
- १९९४ साली पुण्यात झालेल्या पहिल्या पुणे विभागीय ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद वासुदेव मुलाटे यांचेकडे होते.
- बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलन, ३-१-२०१०, संमेलनाध्यक्ष ज.ह. खरात
- मसापची बेलवंडी शाखा व वि.वा. शिरवाडकर युवा साहित्य परिषदेचे १०वे ग्रामीण साहित्य संमेलन: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे, १२-७-२०१२, संमेलनाध्यक्ष : कथाकथनकार डॉ. संजय कळमकर.
- १ले येरवडा विभागीय मराठी साहित्य संमेलन, येरवडा(पुणे), २६-२-२००५, संमेलनाध्यक्ष डॉ.गंगाधर पानतावणे
- रहिमतपूर : आश्लेषा महाजन ह्या पिंपरी (ता.कोरेगांव) येथे १४ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या ४थ्या रहिमतपूर पंचक्रोशी साहित्य संमेलनाच्या-ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. १२ डिसेंबर २०१५ रोजी रहिमतपूर (ता. कोरेगाव जि. सातारा) येथे झालेल्या रहिमतपूर पंचक्रोशी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. आ.ह. साळुंखे होते. ९ फेब्रुवारी २०१९ या दिवशी झालेल्या रहिमत पंचक्रोशी संमेलनाचे ..... हे अध्यक्ष होते. त्याच दिवशी बालकुमार साहित्य संमेलन होते.....
- वर्ताळा, तालु्का मु्खेड (जिल्हा नांदेड) येथे प्रा.लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण साहित्य संमेलन भरले होते.
- ९वे ग्रामीण साहित्य संमेलन, विटा (जिल्हा सांतारा), संमेलनाध्यक्ष आनंद यादव
- २०वे ग्रामीण साहित्य संमेलन, विटा (जिल्हा सातारा), संमेलनाध्यक्ष जयंत साळगावकर
- ५वे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : वैजापूर, ४ एप्रिल २०१०, संमेलनाध्यक्ष भारत सासणे
- ३रे (विदर्भ)ग्रामीण साहित्य संमेलन, शेंबाळ पिंप्री (यवतमाळ जिल्हा)
- दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन, साक्री (धुळे जिल्हा), ७-१२-१९८७
- कोकमठाण (शिर्डी, अहमदनगर जिल्हा) : कवी विचारमंच शेगाव आयोजित ३ रे राज्यस्तरीय साहित्य संमेलन, १ व २ जून २०१९ .संमेलनाध्यक्ष डाॅ. कैलास दौंड
- कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील निमशिरगाव येथे १५ डिसेंबर २०१९ रोजी २३वे (!) ग्रामीण साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्षपदी महावीर जोंधळे होते.
* अठ्ठावन्नावे विदर्भ साहित्य संमेलन धानोरा जिल्हा गडचिरोली येथे 2008 मध्ये संपन्न /अध्यक्ष बाबाराव मुसळे * पहिलेेे अंकुर साहित्य संमेलन, मालेगाव जिल्हा वाशिम येथे संपन्न /1986 /अध्यक्ष बाबाराव मुसळे
* तिसरे ग्रामीण साहित्य संमेलन, शेंबाळपिंपरी जिल्हा यवतमाळ/ 1985 /अध्यक्ष बाबाराव मुसळे
* संत गजानन महाराज साहित्य संमेलन रिसोड जिल्हा वाशिम/ 2008 /अध्यक्ष बाबाराव मुसळे
* चौथे भूमीजन साहित्य संमेलन सावखेड तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद/ 2020/ अध्यक्ष बाबाराव मुसळे
- पहा : लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन
- पहा : लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलन
- पहा: बेळगल्ली साहित्य संमेलन
- पहा : येळ्ळूर साहित्य संमेलन
- पहा : कडोली(जिल्हा बेळगाव) ग्रामीण साहित्य संमेलन
पहा : मराठी साहित्य संमेलने ; जिल्हा साहित्य संमेलने