ग्रामीण साहित्य
ग्रामीण साहित्याने मराठी साहित्यात सध्या वेगळे वळण घेतलेले दिसून येते. यामध्ये आपल्याला प्रकर्षाने असे जाणवते कि, ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण भागातील अनेक प्रश्न आणि समस्या पुढे आणल्या जात आहेत. त्याचे माध्यम म्हणून कथा, कादंबऱ्या, कविता अश्या काही साहित्य प्रकारांचा वापर केला जातो, असे दिसून येते. या साहित्यप्रकाराच्या माध्यमातून हे प्रश्न पुढे आणले जातात. किंवा ती साहित्यकृती त्यासाठी जबाबदार ठरते आणि त्याचबरोबर त्या लेखकाचा संघर्ष जर त्या बदलाच्या दृष्टीने असेल तर ते अधिक पुढे येऊन त्यातून जे अन्याय किंवा समस्या पुढे येतात त्यावर काम करणारे आपल्याला काही प्रमाणात दिसून येतात, यामध्ये उदाहरण बघायचे झाल्यास आनंद यादवांची " गोतावळा " ही कादंबरी घेऊ शकतो तंत्रज्ञानाचा शेतीवर झालेला परिणाम गोतावळा या कादंबरीमध्ये आनंद यादव यांनी शेतीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या नारबा या सालदाराचे शेतकरी मन आणि जीवन यांत्रिकीकरणामुळे कसे प्रभावित होते हे प्रकर्षाने मांडले आहेत. पण त्यांचे कांदबरिचा स्वर व्यवस्था विश्लेषणात्मक नसुन पात्रकेंद्रित आहे. सन १९८५ नंतरचे ग्रामिण कादंबरितिल हाल्याहाल्या दुधु दे या कादंबरींतून सहकाराचे दुटप्पी धोरण स्पष्ट झाले आहे . पांगिरा या विश्वास पाटलांच्या कादंबरींतून ऊस या नगदि पिकाच्या लोभातुन गावावर कसे पाणिसंकट येते, याचे समुहचित्रण आहे. झाडाझडती या कादंबरींतून हे जलसंकट राजकिय स्वरूपातुन कसे धरणग्रस्तांच्या आयुष्याचि राखरांगोळी करते याचे प्रभावि चित्रण करते. तहान कादंबरी गावाच्या पिण्याच्या पाण्याचि आणि चंगळवादाच्या हव्यासाचि गावकेंद्रित जग साकार करते. तर बारोमास कादंबरी शेतकऱ्यांच्या दुःखमय जगण्याभोवति वेढुन राहते. हेच शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय भावनात्मक आणि संघर्षांच्या पातळीवर , कैलास दौड यांच्या कापूसकाळ कादंबरीतून पुढे येतात. कापूस पिकाच्या निमित्ताने शेतकऱ्यांचे जगणे या कादंबरीतून फारच प्रभावीपणाने व्यक्त झालेले आहे. मराठीतील अगदी मोजक्या कादंबऱ्या मध्ये कापूसकाळचा समावेश होतो. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात देखील कापूसकाळचा समावेश झाला होता. "तुडवण" ही त्यांची कादंबरी शिक्षित ग्रामीण तरुणांचे जगणे मांडते.
- ग्रामीण कांदंबरी
मराठीतील समस्या प्रधान ग्रामीण कांदंबरी चिकित्सक अभ्यास (इ. स. १९९०-२००५) या कालखंडातील निवडक कांदंबरीचा अभ्यास.