Jump to content

ग्रामीण विकास

शाश्वत ग्रामीण विकास

शाश्वत विकास म्हणजे भविष्यातील पिढ्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशी तडजोड न करता वर्तमान गरजा पूर्ण करणारा विकास. गावाचा विकास आराखडा तयार करताना तो शाश्वत ग्रामविकास आराखडा असणं गरेजचं आहे. भावी पिढ्यांच्या गरजा लक्षात ठेवून यासाठी आताच्या आपल्या गरजांचे सारासार विचार करून नियोजन ठेवून विकास करणं, पर्यावरण लक्षात ठेवून विकास करणं याला शाश्वत विकास आराखडा असं म्हणतात. जगातील विविध देशांनी आणि संस्थांनी ग्रामविकासासाठी विविध व्याख्या दिल्या आहेत. तसेच ग्रामविकास साध्य करण्यासाठी निश्चित ध्येयधोरणांनी यंत्रणा उभारून योजना राबवल्या आहेत. परंतु विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मानवतेच्या प्रगतीला अडथळा आणणाऱ्या आणि त्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्या अनेक घडामोडींमुळे शाश्वत विकासाच्या संकल्पनेचा मुखवटा लोकांसमोर आला. यामध्ये पर्यावरण संकट, इंधन संकट, उर्जा संकटे, लोकसंख्या, अन्न समस्या, चालू लष्करी संघर्ष, दहशतवादाचा धोका, विविध सामाजिक श्रेणी आणि देशांमधील राहणीमानाचा वाढता फरक इत्यादींचा समावेश आहे.

समग्र ग्रामीण विकास हा शाश्वत ग्रामीण विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. समाजातील मातृशक्ती, सज्जनशक्ती, संतशक्ती, संघशक्ती आणि युवाशक्ती यांच्या माध्यमातून जलसंपदा, जंगल - वन संपदा, जमीन - भूसंपदा, जनावर - जैवविविधता - संपदा, उर्जासंपदा आणि जनसंपदाचा समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग, विचार घेऊन करण्याची पर्यावरणपूरक शाश्वत विकास प्रक्रिया आहे.तसेच ग्रामीण भागात सुविधा राबवून ग्रामीण भागाचा मोठ्या प्रमाणात विकास केला गेला पाहिजे. शाश्वत ग्रामीण विकास करायचा असेल तर ग्रामीण भागातील लोकांची मानसिकता बदलली पाहिजे. ग्रामीण विकासा विषय शिक्षण सोलापूर विद्यापीठाच्या अंतर्गत देले जाते आपण त्याचा लाभ घ्यावा आसे मला वाटते. ग्रामीण विकास विभागात शिक्षण घेतल्यानंतर अनेक ठिकाणी नोकरीची संधी उपबल्ध आहे. परंतु त्याही आता नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात जाऊन सरकारने नवनवीन तंत्रज्ञानस वाव दिला पाहिजे खेड्यापाड्यात जाऊन.तेथील लोकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या पाहिजेत व त्या अंतर्गत उपाय योजना राबविल्या पाहिजेत. जर त्या योजना त्या ग्रामीण व्यक्तीपर्यंत पोहचात नसेल तर त्यासाठी मोठमोठ्या सामाजिक संस्थांनी त्या ग्रामीण भागात जाऊन त्यांना समजेल अशा भाषेत सांगायला हवे.